घरविशेषकिशोर गट राष्ट्रीय खोखोत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची उपांत्य फेरीत धडक

किशोर गट राष्ट्रीय खोखोत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची उपांत्य फेरीत धडक

महाराष्ट्राचे किशोर हरयाणाविरुद्ध तर किशोरी दिल्लीविरुद्ध झुंजणार

३१ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या किशोरांनी तेलंगणावर तर किशोरींनी हरयाणावर रुबाबात विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता किशोर गटात महाराष्ट्राची गाठ हरयाणाशी तर किशोरी गटात दिल्लीशी महाराष्ट्र झुंजणार आहे.

आजच्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या किशोर संघाने तेलंगणाचा ११-०३ असा एक डाव ८ गुणांनी धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या आशिष गौतमने ३:४० मि., नाबाद १:३० मि. संरक्षण करून २ गडी बाद केले, कर्णधार सोत्या वाळवीने २:५० मि. संरक्षण करून १ गडी बाद केला, अथर्व पाटीलने १:३० मि. संरक्षण करून २ गडी बाद केले व हाराद्या वसावेने १:३० मि. संरक्षण करून १ गडी बाद केला व संघासाठी विजय सोपा केला. तर पराभूत तेलंगणाच्या के. शरण व व्ही. कुमारने जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला.  के शरणने १ मि. ४० सें. संरक्षण केले तर उर्वरित खेळाडूंना मैदानात टिकाव धरता आलेला नाही.

महाराष्ट्राच्या किशोरींनी उपउपांत्य फेरीच्या सामन्यात हरयाणावर ११-०९ असा एक डाव २ गुणांनी मोठा विजय साजरा केला. महाराष्ट्राच्या सानिका चाफेने कर्णधाराची खेळी खेळताना ४:०० मि. संरक्षण करून ३ खेळाडू बाद केले, तिला उत्कृष्ट साथ देताना अंकिता देवकरने १:४० मि. संरक्षण करून ३ खेळाडू बाद केले, सुषमा चौधरीने १:४० मि. संरक्षण करून १ खेळाडू बाद केला, तर साई पवारने १:४० मि. संरक्षण केले व मोठ्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर हरयाणाच्या मुस्कानने १ मि. ४५ सें. संरक्षण करत २ खेळाडूंना बाद केले. त्यांच्या प्रीती व रेणु यांनी चांगला खेळ केला.

हे ही वाचा:

GDP ८.४ टक्के; भारतीय अर्थव्यवस्था दुसऱ्या तिमाहीत झेपावली

83 च्या ट्रेलरवर लाखो चाहत्यांच्या उड्या

…म्हणून ट्विटर संस्थापक डॉर्सी यांची पहिली पसंती होती पराग अग्रवाल!

‘हा भारतीय वंशाचा सीईओ विषाणू आहे; याच्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही’

 

इतर निकाल : प. बंगालने कोल्हापूरचा १२-११ असा एक १:३० मि. राखून पराभव केला. कर्नाटकने विदर्भाचा २४-१५ असा धुव्वा उडवला. राजस्थानने तामिळनाडूवर १३-०८ असा विजय मिळवला. छत्तीसगडने आंध्र प्रदेशचा १०-०९ असा ६:०० मि. राखून पराभव केला. तेलंगणाने उत्तराखंडचा ११-१० असा ५:१० मि. राखून पराभव केला तर हरयाणाने दिल्लीचा १८-१४ असा पराभव केला. किशोरींमध्ये कोल्हापूराने उत्तर प्रदेशवर ०९-०८ असा निसटता विजय मिळवला. हरयाणाने तेलंगणावर १०-०१ असा मोठा विजय मिळवला. दिल्लीने केरळचा २०-६ असा पराभव केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version