घरविशेषपहलगाम हत्याकांडाचा सूत्रधार हाशिम मुसाला पाकिस्तानचे कमांडो प्रशिक्षण

पहलगाम हत्याकांडाचा सूत्रधार हाशिम मुसाला पाकिस्तानचे कमांडो प्रशिक्षण

हाशिम मुसाच्या अटकेसाठी २० लाख रुपयांचे बक्षीस

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २६ जणांच्या निर्घृण हत्यामागचा मास्टरमाइंड हाशिम मुसा याला पाकिस्तानमध्ये एलिट पॅरा-कमांडो प्रशिक्षण मिळाल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांकडून समजते. या प्रशिक्षणामुळेच त्याच्या दहशतवादी कारवायांना अधिक प्रभावी रूप मिळाले, अशी माहिती समोर आली आहे.

वयाने सुमारे विशीत असलेला मुसा हा पूर्वसैनिक असल्याचे सांगितले जाते. तो कठुआ आणि सांबा सेक्टरमार्गे भारतात घुसखोरी करून आला होता. त्यानंतर त्याने राजौरी-पुंछ जिल्ह्याच्या डेरा की गली भागात सक्रिय होऊन लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेच्या मॉड्यूलचा भाग म्हणून अनेक हल्ले घडवून आणले.

हे ही वाचा:

ब्रिटन दौऱ्यात पीयूष गोयल करणार प्रमुख उद्योग नेत्यांशी चर्चा

हम हे नंबर वन !

कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला

भारतामध्ये सोन्याची मागणी ८०० टनांहून अधिक

पाकिस्तानी SSG कमांडोचे प्रशिक्षण


पाकिस्तानची स्पेशल सर्व्हिसेस ग्रुप (SSG) ही विशेष पॅरा-कमांडो युनिट, गनिमी युद्ध, उच्च शारीरिक सहनशक्ती, दुर्गम भागांतील लढाई, आणि गुप्त हलचाली यांमध्ये प्रवीण मानली जाते. हाशिम मुसाच्या कारवायांमध्ये याच प्रशिक्षणाचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे की, या गटाचे सतत ठिकाण बदलणे, सिव्हिलियन संपर्क टाळणे, अन्नासाठी गावांकडे न जाणे यामुळे त्यांच्या व्यवसायिक प्रशिक्षणाचा अंदाज येतो. त्यांनी M4 कार्बाईन सारख्या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला आहे, जे केवळ व्यावसायिक लष्करी प्रशिक्षणातून हाताळता येते.

हाशिम मुसावर २० लाखांचे बक्षीस


राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने हाशिम मुसाच्या अटकेसाठी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या गटाचे कार्यपद्धती पाहता स्पष्ट होते की, हा गट केवळ विचारसरणीवर आधारित नसून, पूर्णपणे प्रशिक्षित आणि सुसज्ज आहे. त्यामुळे या नेटवर्कचा निर्दालन करणे अधिक कठीण व धोकादायक ठरते आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version