घरविशेषममता बॅनर्जी जखमी, डोक्याला गंभीर दुखापत

ममता बॅनर्जी जखमी, डोक्याला गंभीर दुखापत

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्या घरात पडल्याचे वृत्त तृणमूलने आपल्या एक्स हँडलवर दिले आहे.

ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर मोठी जखम झाली असून त्यातून भळाभळा रक्त येत असल्याचे छायाचित्र एक्स हँडलवर पक्षाच्या वतीने टाकण्यात आले आहे.

ममता बॅनर्जी या सध्या लोकसभेच्या तयारीसाठी विविध ठिकाणी सभा घेत आहेत. मागे विधानसभा निवडणुका होणार असताना त्यांच्या पायाला दुखापत झाली होती आणि त्या पायाला प्लास्टर बांधून प्रचार करत होत्या. आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्या पुन्हा जखमी झाल्या आहेत.

हे ही वाचा:

राहुल गांधींनी विठ्ठलमूर्ती स्वीकारण्यास  केली टाळाटाळ; व्हीडिओ व्हायरल

पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीच सक्षम!

अनिल परबांना दणका; दापोलीमधील साई रिसॉर्ट चार आठवड्यात पाडावे लागणार

अनिल परबांकडून रमजान, शिवजयंतीच्या कार्यक्रमांसाठी ‘सिंगल विंडो सिस्टिम’ची मागणी

ममता यांना लवकर बरे वाटावे म्हणून विविध स्तरावर प्रार्थना केल्या जात आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version