घरविशेषमेट्रोची कामे मुदतीपूर्वी करा नाहीतर दोन कोटींचा दंड!

मेट्रोची कामे मुदतीपूर्वी करा नाहीतर दोन कोटींचा दंड!

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) मेट्रो फेज १ च्या मार्ग २ आणि ७ कॉरिडॉरच्या स्थानकांमधील अंतर्गत काम करणाऱ्या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. एमएमआरडीए सध्या दोन्ही मार्गांवर ट्रायल रन्स घेत आहे. जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लि., एनसीसी लि., गोदरेज आणि कॉरिडॉर इन्फ्राप्रोजेक्ट्स या चार कंपन्यांना स्थानकांची अंतर्गत कामे विलंबाने करत असल्यामुळे नोटीस पाठविण्यात आल्याचे मेट्रोपॉलिटन कमिशनर एस व्ही आर श्रीनिवास यांनी ‘टाइम्स’शी बोलताना सांगितले.

दिलेल्या मुदतीपूर्वी ही कामे पूर्ण करून न दिल्यास या कंपन्यांकडून दोन कोटीहून अधिक दंड वसूल केला जाईल अशी माहिती सूत्रांमार्फत समजली आहे. स्थानकांचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा असल्याचेही सांगण्यात आले.

हे ही वाचा:

लोखंडवाला, मुर्गन चाळ हे अमलीपदार्थ तस्करांचे अड्डे!

न भेटणाऱ्या मुख्यमंत्र्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांची विशेष भेट

…आणि आर्यन खानसोबत सेल्फी काढण्याचा मोह अधिकाऱ्यालाही आवरला नाही!

दर १५ दिवसांनी आरटीपीसीआर करण्याच्या नियमामुळे शिक्षक वैतागले

डहाणूकरवाडी ते आरे (१८ स्थानके) हा प्रकल्पाचा २० किलोमीटरचा पहिला टप्पा आहे. या मेट्रो मार्गामुळे वाहनांची गर्दी २५ टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन यांची टीम लवकरच दोन्ही कॉरिडॉरवरील ट्रायल रनची तपसणी करेल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त सुरक्षा प्रमाणपत्र देतील. त्यानंतर प्रवासी वाहतुकीला परवानगी मिळेल.

एमएमआरडीने काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२० ही अंतिम मुदत दिली होती. मात्र, कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे काम ठप्प झाले होते. मेट्रो मार्गांना ६ ऑक्टोबर २०१५ रोजी फडणवीस सरकारकडून मंजुरी देण्यात आली होती. ११ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version