घरविशेषभय आणि उत्कंठा वाढवणाऱ्या 'भुतियापंती' चे मोशन पोस्टर प्रदर्शित

भय आणि उत्कंठा वाढवणाऱ्या ‘भुतियापंती’ चे मोशन पोस्टर प्रदर्शित

भुतियापंती या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपट दिग्दर्शक संचित यादव हा नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चित्रपटाचे मोशन पोस्टर बघून हा एक भयपट असल्याचे समजते. पण चित्रपटाचे नाव बघता हा एक हॉरर – कॉमेडी अशा प्रकारचा चित्रपट असण्याची शक्यता अधिक आहे. या मोशन पोस्टर मधून भय आणि उत्कंठा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जागृत होतात. हीच या मोशन पोस्टरची खासियत आहे.

या चित्रपटात कमलेश सावंत, अरुण नलावडे, प्रभाकर मोरे, अंकुर वाढवे, सुदेश म्हशीलकर, संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ – यादव, अमित चव्हाण, तृशांत पाते, समीर काळबे, अमित शिंदे, सचिन खंडागळे अशी कलाकारांची तंगडी फळी काम करताना दिसेल. किमिन्ह प्रॉडक्शन तर्फे याचे हा चित्रपट प्रस्तुत केला जात आहे. तर व्हीबी प्रॉडक्शन आणि इंटरटेनमेंट यांची ही निर्मिती आहे. विनय येरापले हे या चित्रपटाचे लेखक असून विनोद बरदाडे हे या चित्रापाचे निर्माते आहेत. या चित्रपटाला अभिनय जगताप यांचे संगीत असणार आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारने माझ्या हत्येचा कट रचलाय

‘राजकारण गेलं चुलीत, फक्त महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे’

मध्य रेल्वेला कमाईत मिळाले अव्वल स्थान!

हिजाब वादाचे पडसाद विरारमध्ये?

संचित यादव यांनी या आधी बे एके बे नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले होते. ही एका शिक्षकाची कथा असून या चित्रपटाच्या माध्यमातून एका महत्वाच्या सामाजिक विषयावर भाष्य करण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version