घरविशेषमुंबई सेंट्रल मंडळात स्वच्छता पंधरवड्यात विशेष स्वच्छता अभियान

मुंबई सेंट्रल मंडळात स्वच्छता पंधरवड्यात विशेष स्वच्छता अभियान

२८० प्रमुख ठिकाणी स्वच्छता

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल मंडळात स्वच्छता पंधरवडा २०२६ अंतर्गत स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि जनजागृतीच्या उपक्रमांना वेग देण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून मंडळात तीन दिवसीय विशेष सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छ भारत दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये रेल्वे कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रमुख रेल्वे स्थानके, यार्ड, कोचिंग डेपो आणि प्रशासकीय कार्यालयांमध्ये हे अभियान राबविण्यात आले.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष स्वच्छता मोहिमेत एकूण २८० प्रमुख ठिकाणांचा समावेश करण्यात आला. ७१ हून अधिक स्थानकांवरील १७४ स्वच्छतागृहांची डी-स्केलिंग करण्यात आली, तर २८० कचरापेट्यांची सखोल स्वच्छता करण्यात आली. याशिवाय ७७ किलोमीटरहून अधिक लांबीच्या नाल्या आणि जलनिचरा मार्गांची सफाई करण्यात आली. सुमारे १४० प्रशासकीय कार्यालयांमध्येही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेचे दर्जेदार मानक कायम ठेवण्यासाठी २४ स्थानकांवर स्क्रबर-ड्रायर, हाय-प्रेशर जेट वॉशर, राइड-ऑन स्वीपर आणि फॉगिंग मशीन यांसारख्या आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. यासोबतच २७ स्वच्छतागृहे आणि स्नानगृहांची स्वच्छता करून तेथील सुविधांची कार्यक्षमताही तपासण्यात आली.
हे ही वाचा:
अॅप-बेस्ड कॅबमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी कडक नियम

न्यायमूर्ती भुयान शिष्टाचार विसरले का?

होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर हल्ला; ११ भारतीय जखमी

न्यूट्रिनो कणांच्या शोधासाठी फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल

प्रवाशांना मिळणाऱ्या खानपान सेवांच्या स्वच्छतेवरही विशेष भर देण्यात आला. स्वच्छता आणि वाणिज्य विभागाच्या पथकांनी खाद्यपदार्थांच्या स्टॉलची तपासणी केली. तब्बल ७८० खानपान युनिट्स, १४ पॅन्ट्री कार आणि तीन बेस किचनमध्ये सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात आले. खाद्यपदार्थांच्या साठवणूक क्षेत्रात कीटक आणि उंदीर नियंत्रणासाठीही व्यापक उपाययोजना करण्यात आल्या. या तीन दिवसीय विशेष मोहिमेदरम्यान पाच टनांहून अधिक कचरा जमा करण्यात आला. त्यामुळे २ ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रेल्वे परिसरातून हटवून वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आलेल्या कचऱ्याचे एकूण प्रमाण सुमारे आठ टनांवर पोहोचले आहे.

स्वच्छता अभियानासोबतच जनजागृतीवरही विशेष लक्ष देण्यात आले. नंदुरबार रेल्वे स्थानकावर विद्यार्थी आणि रोटरी क्लबच्या सदस्यांनी स्वच्छतेचे महत्त्व आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट याबाबत जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर केले. विरार स्थानकावरही एनएसएस स्वयंसेवक आणि लायन्स क्लबच्या सदस्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली. स्वच्छता पंधरवडा २०२६च्या माध्यमातून मुंबई सेंट्रल मंडळाकडून रेल्वे स्थानके आणि परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि प्रवाशांसाठी अधिक सुविधाजनक ठेवण्यासाठी विविध स्तरांवर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version