घरविशेषसूर्यकुमार यादवला दुखापत तर ईशान किशनवर मधमाशीचा हल्ला!

सूर्यकुमार यादवला दुखापत तर ईशान किशनवर मधमाशीचा हल्ला!

भारतीय क्रिकेट संघाला बसला धक्का

- Advertisement -

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमधील एकदिवसीय क्रिकेट सामना आज, रविवारी धर्मशाला येथे होणार आहे. मात्र तत्पूर्वीच भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. भारतीय संघाचे खेळाडू सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन या दोघांनाही दुखापत झाली आहे. दुखापत झाल्यामुळे या दोन्ही खेळाडूंनी सराव केलेला नाही. त्यामुळे आज, रविवारी होणाऱ्या सामन्यात प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना मैदानात उतरवणार, याकडे तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज, रविवारी दुपारी दोन वाजता सामना रंगणार आहे.

शनिवारी संध्याकाळी भारतीय संघाचे खेळाडू सराव करत होते. या दरम्यान भारतीय संघाच्या रघूने सूर्यकुमार यादवला गोलंदाजी केली. तेव्हा चेंडू त्याच्या उजव्या मनगटाला लागला. त्यानंतर त्याच्या मनगटाला बर्फ लावण्यात आला. चेंडू मनगटावर लागल्याने सूर्यकुमारने सराव केला नाही. तर, फलंदाजीचा सराव करताना इशान किशनला मधमाशीने चावले. त्यावर त्याने तातडीने उपचार करून विश्रांती घेतली. दोन्ही महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. याआधीच टाचेच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या धर्मशाळेत आलेला नाही आणि त्यात हे दोन प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत.

हे ही वाचा.. 

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांची हुर्यो!

आईमुळे बलात्कारी पुत्राला २० वर्षे सक्तमजुरी!

मसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!

पॅलेस्टाईनमधील लोकांच्या मदतीसाठी भारताचे विमान रवाना!

धर्मशाला येथे होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय आणि न्यूझीलंडच्या संघांनी शनिवारी जोरदार सराव केला. शनिवारी दुपारी दोन वाजता सरावासाठी स्टेडिअमवर पोहोचलेल्या न्यूझीलंडच्या संघाने आधी अर्धा तास फुटबॉल खेळून त्यानंतर नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांनी खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर खेळाडूंनी नेटमध्ये सराव केला. विराट कोहली, शुभमन गिल, इशान किशन, रवींद्र जाडेजा यांनी नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version