घरविशेष२७ देशांमध्ये ‘रामायण’ सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट

२७ देशांमध्ये ‘रामायण’ सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट

जगभरातील कमाई १,७७७ कोटींवर

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाने आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम नोंदवला आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि रवी दुबे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आता २७ देशांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. जगभरातील चित्रपटाची एकूण कमाई १,७७७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

प्रदर्शनाच्या सुरुवातीला ‘रामायण’ने सलग सात दिवस जगभरात दररोज १०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. मात्र, तिसऱ्या आठवड्यात भारतातील दैनंदिन कमाई १० कोटी रुपयांच्या खाली आली. प्रदर्शनाच्या २२व्या दिवसापर्यंत चित्रपटाने देशांतर्गत बाजारपेठेत ९९२ कोटी, तर जगभरात एकूण १,१८५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर परदेशातील बाजारपेठांमध्ये चित्रपटाने पुन्हा वेग पकडला.

अमेरिका, थायलंड, व्हिएतनाम आणि नेपाळसारख्या देशांमध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. २२ दिवसांत परदेशातील कमाई ६४ दशलक्ष डॉलरच्या पुढे गेली. त्यामुळे जगभरातील एकूण कमाई १,७७७ कोटी रुपयांवर पोहोचली. या कामगिरीसह ‘रामायण’ सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. व्यापार विश्लेषकांच्या मते, पुढील आठवड्यात तो ‘बाहुबली २’ आणि ‘धुरंधर २’ यांना मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतो.

हे ही वाचा : 

‘रामायण’ चित्रपटावर आक्षेप असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा!

महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारचे बहुमताचे गणित जुळणार?

मुख्यमंत्री विजय यांचा निवडणूक विजय न्यायालयीन कसोटीवर

३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन

अमेरिका, ब्रिटन, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम आणि कंबोडियासह युरोपमधील अनेक देशांत चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. विशेषतः आग्नेय आशियातील प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे. निर्मात्यांनी २७ देशांमध्ये चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटाचा विक्रम केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या दोन भागांच्या चित्रपट मालिकेतील पहिल्या भागात रणबीर कपूरने प्रभू राम, साई पल्लवीने सीता, यशने रावण आणि रवी दुबेने लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग २०२८ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version