घरविशेषरणबीर आलियाचा 'सावरीया'

रणबीर आलियाचा ‘सावरीया’

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लग्न सोहळ्याची चर्चा सुरू होती. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा विवाह सोहळा गुरुवार, १४ एप्रिल रोजी मुंबईत पार पडला. बॉलिवूड मधील या जोडीच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. चाहत्यांना दोघांच्या लग्नाबाबत कमालीची उत्सुकता होती. लग्न पार पडल्यानंतर लग्नाचे फोटो आलियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मुंबईतल्या वांद्रे येथील ‘वास्तू’ बंगल्यावर आलिया- रणबीरचा लग्नसोहळा पार पडला. आलिया- रणबीरच्या लग्नसोहळ्यात कपूर आणि भट्ट कुटुंबियांसह बॉलिवूडमधली काही दिग्गज मंडळी उपस्थित होती. पंजाबी रितीरिवाजांनुसार दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांचेही लग्नाचे सर्व विधी अत्यंत गुप्तता पाळून करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

एलन मस्क ट्विटर खरेदी करणार?

फडणवीसांनी १४ ट्विटस करत केली शरद पवारांची पोलखोल

एनसीबी मुंबई विभागाच्या संचालक पदी अमित घावटे

पहिलं तिकीट खरेदी करून पंतप्रधान मोदींनी केले प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून फोटोला कॅप्शन दिले आहे. “आज आमच्या कुटूंब आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत आमच्या आवडत्या ठिकाणी आम्ही लग्न केले. आमच्यासोबत बऱ्याच आठवणी असताना आता आणखी नव्या आठवणी तयार करण्यासाठी प्रतिक्षा करू शकत नाही. आमच्या आयुष्यातील या अत्यंत महत्वाच्या काळात तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद,” असे कॅप्शन आलियाने दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version