घरविशेषरत्नागिरी विमानतळ सज्ज; जानेवारीपासून विमानांचे उड्डाण!

रत्नागिरी विमानतळ सज्ज; जानेवारीपासून विमानांचे उड्डाण!

जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

कोकणवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरी शहर थेट हवाई मार्गाने जोडले जाणार आहे. रत्नागिरी विमानतळाची अद्ययावत टर्मिनल इमारत पूर्णपणे तयार झाली असून, येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून येथून प्रत्यक्ष प्रवासी विमानसेवा सुरू होण्याची दाट शक्यता आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.

रत्नागिरी आणि चिपी विमानतळाच्या उभारणीतील फरक स्पष्ट करताना पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, “सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाची टर्मिनल इमारत उभारण्यासाठी तब्बल ८ वर्षांचा कालावधी लागला होता. मात्र, रत्नागिरी विमानतळाची टर्मिनल इमारत अवघ्या २ वर्षांत पूर्ण करण्यात आली आहे. चिपी विमानतळाच्या तुलनेत रत्नागिरीचे हे विमानतळ अधिक सुसज्ज आणि सोयीस्कर असेल. विमानतळाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येथील विमानसेवा सुरू होईल. विशेष म्हणजे, हे विमानतळ रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून केवळ २ किलोमीटर अंतरावर असल्याने प्रवाशांना मोठी सोय होणार आहे.”

कोकणात सद्यस्थितीत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, त्यासाठी नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून मदत देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अशा कठीण परिस्थितीत रत्नागिरीच्या पर्यटन उद्योगाला चालना देणाऱ्या आणि स्थानिकांना रोजगार मिळवून देणाऱ्या मोठ्या घोषणा उदय सामंत यांनी केल्या आहेत.

हे ही वाचा:

राजस्थान रेल्वे ट्रॅक स्फोटप्रकरणी पाक कनेक्शन उघड!

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा वरिष्ठ कमांडर ठार

उत्तराखंडमध्ये काँग्रेस आमदाराने माईक फेकला, खुर्चीने केली मारहाण

ललित मोदी आता अधिकृतपणे ब्रिटिश नागरिक

रत्नागिरीमध्ये ‘एक्स्प्रेस इन’ आणि ‘महिंद्रा क्लब’ ही दोन भव्य फाईव्ह स्टार हॉटेल्स उभी राहत आहेत. या दोन्ही हॉटेल्सच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर ६०० ते ७०० जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या दोन्ही फाईव्ह स्टार हॉटेल्सना ‘टाटा स्किल सेंटर’शी टायअप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या स्किल सेंटरमधून विविध व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडलेल्या स्थानिक तरुणांना या दोन्ही हॉटेल्समध्ये प्राधान्याने रोजगार देण्याचा निर्णय हॉटेल व्यवस्थापनाने घेतला असल्याची माहिती सामंत यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version