घरविशेषऋषभ पंतचा नवा विक्रम!

ऋषभ पंतचा नवा विक्रम!

भारतीय विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत याने टेस्ट क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. टेस्टमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय म्हणून त्याने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मागे टाकला आहे.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरणाऱ्या पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात २४ चेंडूत २७ धावा केल्या. या खेळीत त्याने २ षटकार आणि २ चौकार ठोकले.

पंतने आतापर्यंतच्या ४८ टेस्ट सामन्यांमध्ये तब्बल ९२ षटकार ठोकले आहेत. तर वीरेंद्र सेहवाग यांनी १०३ टेस्टमध्ये ९० षटकार मारले होते.

या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर असून त्यांनी ६७ टेस्टमध्ये ८८ षटकार ठोकले आहेत.
रवींद्र जडेजा८८ टेस्टमध्ये ८० षटकार — चौथ्या स्थानी, तर एम.एस. धोनी९० टेस्टमध्ये ७८ षटकार — पाचव्या स्थानी आहेत.

ईडन गार्डन्स टेस्ट : भारताची पकड मजबूत

ईडन गार्डन्स येथे सुरू असलेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आघाडी घेतली आहे.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेचा डाव १५९ धावांवर संपुष्टात आला.
एडेन मार्करमने ३१, वियान मुल्डर आणि टोनी डी झोरजी यांनी २४-२४ धावा केल्या.

भारताकडून जसप्रीत बुमराहने ५ विकेट, तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

याच्या उत्तरात भारताने ५० षटकांच्या खेळात ५ बाद १६४ धावा केल्या आहेत.

टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. केवळ १८ धावांवर यशस्वी जैस्वाल (१२) बाद झाला.

येथून वॉशिंग्टन सुंदर आणि के.एल. राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली.
राहुल ३९, सुंदर २९ धावा करून बाद झाले.
ऋषभ पंतने २७ धावा केल्या.

दरम्यान, कर्णधार शुभमन गिल ४ धावांवर रिटायर्ड हर्ट होत पॅव्हेलियनमध्ये परतला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version