घरराजकारणथंड बसलात तर तुमचे नेतृत्व करणार नाही!

थंड बसलात तर तुमचे नेतृत्व करणार नाही!

भीमाशंकर अभयारण्यातील टोरेंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरून सध्या महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.  वृक्षतोडीवरुन विरोधकांनी आरोप केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची कर्जतमध्ये सभा पार पडली. मला मुख्यमंत्र्यांना दहा प्रश्न विचारायचे आहेत, असे म्हणत यावेळी राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यात त्यांनी या प्रकरणावर थंड बसणार असाल तर तुमचे नेतृत्व मी करणार नाही, अशी अगतिक भूमिका व्यक्त केली.

त्यांनी सवाल उपस्थित केले की,  सह्याद्रीकडे बघून शिवरायांना काय वाटत असेल? थंड बसणार असाल तर मी तुमचे नेतृत्व करणार नाही. ग्रामीण महाराष्ट्रातील जेन-झी कधी जागे होणार? महाराष्ट्रातले आमदार खासदार काय करत आहेत.  महाराष्ट्रातले आमदार खासदार आमदार एवढे लाचार कसे झाले. आज जंगलांवर वेळ उद्या शहरांवर येणार. गडचिरोली जंगल तोडून खाणीला परवानगी दिली. प्रकल्पाला विरोध झाल्यास वीज बंद केली जाईल. सर्बियात तरुणांनीच सत्ता बदलली. सह्याद्रीच्या कुशीमध्ये २३ प्रकल्प येत आहेत. २३ पैकी ३ प्रकल्प हे केंद्राचे बाकी सर्व खासगी.

हे ही वाचा:

लातूरमध्ये कर्जवसुलीच्या तगाद्याने तरुणाची आत्महत्या

आझम खान यांच्या जौहर विद्यापीठावर ईडीची कारवाई

लडाख देशातील पहिले १०० टक्के सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश

संजय राऊत, निखिल वागळे हाजिर हो!

कर्जत येथे होत असलेल्या प्रकल्पासाठी वृक्षतोड केली जाणार असल्यामुळे त्यावरून राजकारण सुरू आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला काय फायदा होईल, याविषयी सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र आता हा प्रकल्प होऊ देणार नाही, असा पवित्रा विरोधक आणि पर्यावरणवाद्यांनी घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे कर्जतला गेले होते. तिथे त्यांनी सदर प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली आणि संध्याकाळी त्यांचे भाषण झाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version