घरविशेषशाहरुख खानने नोटीस पाठवलीच नाही!

शाहरुख खानने नोटीस पाठवलीच नाही!

अनंत अंबानींसोबतच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी स्पष्टीकरण

अभिनेता शाहरुख खानने अनंत अंबानी यांच्यासोबतच्या व्हायरल व्हिडीओवरून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुविग्य शर्मा याला कायदेशीर नोटीस पाठवल्याच्या वृत्तांचे खंडन करण्यात आले आहे. शाहरुख खानच्या अधिकृत कायदेशीर प्रतिनिधींनी अशी कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शाहरुख खानने कोणत्याही वकिलाला किंवा कायदा संस्थेला अशी नोटीस बजावण्याचे निर्देश दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हिरानी असोसिएट्स या कायदा संस्थेने सोशल मीडियावर निवेदन प्रसिद्ध करून याबाबत स्पष्टीकरण दिले. २३ नोव्हेंबर २०२६ रोजीची कथित कायदेशीर नोटीस सोशल मीडिया आणि काही वृत्तमाध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. मात्र, ही नोटीस शाहरुख खानने दिलेली नाही किंवा त्याच्या वतीनेही जारी करण्यात आलेली नाही, असे संस्थेने स्पष्ट केले. शाहरुख खानने आपल्यासह कोणत्याही वकिलाला अशी नोटीस पाठवण्यास सांगितलेले नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सुरुवात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे झाली. या व्हिडीओमध्ये उद्योगपती अनंत अंबानी आणि आध्यात्मिक गुरू सद्गुरू यांच्यातील संवादासोबत शाहरुख खान आणि अनंत अंबानी यांच्यातील वेगळ्या संवादाचे दृश्य दाखवण्यात आले होते. अनंत अंबानी यांनी शाहरुख खान यांना शांत राहण्यास सांगितल्याचा दावा व्हिडीओसोबत करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावरून चर्चा सुरू झाली.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे हित जपणारा पक्ष म्हणजे काँग्रेस!

संविधान कमकुवत करणाऱ्यांच्याच हाती पाच दशके सत्ता

काश्मीरमधून गायब झालेले ३० जण पाकिस्तानात सक्रिय

अनंत अंबानींसोबतच्या व्हायरल व्हिडीओवरून शाहरुखची कायदेशीर नोटीस

या व्हिडीओवरून शाहरुख खानने बदनामीची नोटीस पाठवल्याचे वृत्त यापूर्वी प्रसिद्ध झाले होते. कथित नोटिशीत व्हिडीओ हटवण्यासह काही मागण्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, आता शाहरुखच्या वकिलांनीच या वृत्तांचे खंडन केले आहे. तसेच माध्यमांनी आणि सोशल मीडिया पेजेसनी माहितीची खातरजमा करून शाहरुख खानच्या नावाने चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध केलेला मजकूर दुरुस्त करावा किंवा हटवावा, अशी विनंती केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version