घरविशेषपद्मभूषण राजदत्त आणि पद्मश्री वासुदेव कामत यांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम—अभ्यासोनी प्रकटावे!

पद्मभूषण राजदत्त आणि पद्मश्री वासुदेव कामत यांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम—अभ्यासोनी प्रकटावे!

चित्रपट व चित्रकला क्षेत्रातील दोन महान विभूतींचा गौरव करणारा एक भव्य कार्यक्रम ‘अभ्यासोनी प्रकटावे!’ ३ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला आहे. संस्कार भारती, कोंकण प्रांत यांच्या वतीने आयोजित होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात चित्रपट दिग्दर्शक पद्मभूषण श्री. राजदत्त आणि चित्रकार पद्मश्री श्री. वासुदेव कामत यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात रसिकांना या ऋषितुल्य कलावंतांना प्रत्यक्ष भेटण्याची दुर्मीळ संधी मिळणार असून, अनेक दिग्गज कलावंत, चित्रकार व चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. सुप्रसिद्ध गायिका आणि संगीतकार उषाताई मंगेशकर यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाची खास शोभा ठरणार आहे. संस्कार भारतीतर्फे जनतेस आवाहन करण्यात आले आहे की, “आपली उपस्थिती हाच आमच्यासाठी सन्मान आहे.”

चित्रकला व चित्रपटसृष्टीच्या मैफलीचा आनंद घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन संस्कार भारती, कोंकण प्रांताचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेता व निर्माता सुनील बर्वे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून, कार्यक्रमासाठी सर्व सहभागींसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.

इच्छुकांनी खालील लिंकवर नोंदणी करावी
नोंदणी लिंक: https://forms.gle/XLmFn3iCs4j6Lmvz7
नोंदणीसाठी संपर्क:
श्रीहरी कुलकर्णी – 96191 91983
संकेत शिंगोटे – 86910 68976

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version