घरविशेषभारतीय फार्मा बाजारात मजबूत वाढ

भारतीय फार्मा बाजारात मजबूत वाढ

भारतीय फार्मा मार्केट (IPM) ने यावर्षी जून महिन्यात वार्षिक आधारावर ११.५ टक्क्यांची ठोस वाढ नोंदवली आहे. ही माहिती बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालातून देण्यात आली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या मासिक अहवालानुसार, मागील वर्षी जूनमध्ये IPM मध्ये ७ टक्क्यांची वाढ झाली होती, तर मे २०२५ मध्ये ही वाढ ६.९ टक्क्यांवर होती. अहवालानुसार, रेस्पिरेटरी (श्वसन), कार्डियक (हृदयविकार), सेंट्रल नर्वस सिस्टिम (मध्य तंत्रिका तंत्र) आणि वेदनाशामक थेरपी अशा क्षेत्रांतील चांगल्या कामगिरीमुळे जूनमधील ही वाढ शक्य झाली. या विभागांतील वाढ IPM च्या एकूण वाढीपेक्षा अधिक होती.

हंगामी बदलांमुळे एक्यूट थेरपी (त्वरित उपचार क्षेत्रात) वाढ झाली. जून २०२४ मध्ये ही वाढ ७ टक्के आणि मे २०२५ मध्ये ५ टक्के होती, परंतु यावर्षी जूनमध्ये ती ११ टक्क्यांवर पोहोचली. जूनमध्ये अँटी-इन्फेक्टिव्ह औषधांमध्ये (संसर्गविरोधी औषधे) देखील मागील महिन्यांच्या तुलनेत लक्षणीय सुधारणा दिसून आली. अहवालानुसार, मागील १२ महिन्यांत IPM च्या एकूण वाढीमध्ये ४.२ टक्के किंमतवाढ, २.३ टक्के नवीन उत्पादने आणि १.५ टक्के विक्री खप वाढ यांचा वाटा होता.

हेही वाचा..

डीआरडीओची आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल…

चकमकीत दोन नक्षलवादी ठार

सीरियाकडून इस्रायली हवाई हल्ल्याची निंदा

पाच बांग्लादेशी नागरिक अटकेत

तसेच, उद्योगाने ‘मूव्हिंग अ‍ॅन्युअल टर्नओव्हर’ (MAT) च्या आधारे ८ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे. क्रॉनिक थेरपी (दीर्घकालीन उपचार) मध्ये वाढ १० टक्के तर एक्यूट थेरपीमध्ये ६.८ टक्के वाढ झाली. कार्डियक थेरपीमध्ये सर्वाधिक ११.८ टक्के वाढ झाली, त्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टम (CNS) मध्ये ९.१ टक्के आणि डर्मल थेरपी (त्वचारोग उपचार) मध्ये ८.६ टक्के वाढ नोंदवली गेली.

अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की जूनमध्ये एकूण IPM मध्ये एक्यूट सेगमेंटचा वाटा ६०.८ टक्के होता, तर त्यामध्ये वार्षिक वाढ ६.८ टक्के होती. याव्यतिरिक्त, अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की जूनमध्ये भारतीय फार्मा कंपन्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी केली. जून २०२५ पर्यंत, भारतीय फार्मा कंपन्यांचा IPM मध्ये ८४ टक्क्यांचा बहुलांश हिस्सा होता, उर्वरित हिस्सा बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे होता. अहवालानुसार, भारतीय कंपन्यांची वाढ जून 2025 मध्ये ११.६ टक्के होती, तर बहुराष्ट्रीय कंपन्यांची वाढ ११.२ टक्के इतकी होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version