घरविशेषदिवंगत विनय आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन

दिवंगत विनय आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन

प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे यांच्या ११ व्या स्मृतिदिना निमित्त विनय आपटे प्रतिष्ठान आणि विलेपार्ले येथील साठये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लघु चित्र (शॉर्ट फिल्म ) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शॉर्ट फिल्म पाठवण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर पर्यंत आहे.

या वर्षी या शॉर्ट फिल्म्सना विषयाचे बंधन नाही. कुठल्याही विषयावर शॉर्ट फिल्म्स पाठवता येतील. मात्र ती जास्तीत जास्त २० मिनिटांची असावी. त्यासाठी २५ वर्षा खालील आणि २५ वर्षावरील असे दोन वयोगट ठेवण्यात आले आहेत. तसेच या शॉर्ट फिल्म्स मराठी, हिन्दी आणि इंग्रजी भाषेत पाठवता येतील.

हेही वाचा..

गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे!

पंतप्रधान मोदींनी श्रीशैलम मंदिरात केली पूजा-अर्चना

ऑपरेशन सिंदूर आमच्या आत्मनिर्भरतेचा जिवंत पुरावा

किती टक्के भारतीय गाडी खरेदी करणार ?

प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच प्रवेशिका पाठवता येईल. दोन्ही गटातील सर्वोत्कृष्ट विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका vinayaptepratishthan@gmail.com या संकेतस्थळावर दि. २५ नोव्हेंबर पर्यंत पाठवायच्या आहेत. प्रवेश मूल्य ५०० रुपये आहे. स्पर्धेतील दोन्ही गटात प्रत्येकी प्रथम क्रमांकाच्या शॉर्ट फिल्मला १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला १० हजार आणि तृतीय क्रमांकाला ७ हजार ५०० रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक पुरुसोत्तम बेर्डे, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शक आणि ज्येष्ठ संकलक राजन वाघधरे, जाहिरात तज्ज्ञ भरत दाभोळकर , ज्येष्ठ चित्रपट संकलक भक्ति मायाळू आणि लेखिका आणि गीतकार रोहिणी निनावे हे आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version