घरविशेषनागपूरमधील कृषी कंपनीला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू

नागपूरमधील कृषी कंपनीला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू

नागपूर हिंगणा एमआयडीसी भागातील कटारिया कृषी कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली.तीन कामगारांचा होरपळून मृत्यू तर 20 ते 30 कामगार या आगीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.अग्निशमन दलाचे जवान गेल्या एक तासापासून ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत

- Advertisement -

नागपूर हिंगणा एमआयडीसी भागातील कटारिया कृषी कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली.तीन कामगारांचा होरपळून मृत्यू तर २० ते ३० कामगार या आगीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.आग एवढी भीषण असल्याने एक तासापासून बचाव कार्य सुरु आहे.अग्निशमन दलाचे जवान गेल्या एक तासापासून ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आग विझण्याऐवजी भडकतानाच दिसत आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. या आगीत आतापर्यंत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

नागपूर मधील कटारीया यांच्या कृषी कंपनीला आग लागली असून बायोमास कंपनीत इलेक्ट्रीक पॅनलमध्ये ब्लास्ट झाल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. या आगीत आगीत कंपनीचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.कटारिया अॅग्रो कंपनीत बायोमासपासून बॅलट बनविण्याचं काम होतं. या बायोमासलाच आग लागली. त्याशिवाय या कंपनीत भुसा मोठ्या प्रमाणावर असल्याने भुश्याने भराभर पेट घेतल्याने आग अधिकच भडकली. आग आणि धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले. त्यामुळे सर्वांचीच भंबेरी उडाली.

हे ही वाचा:

खासदारकी रद्द झाल्यामुळे राहुल गांधींनी २० वर्षांनी सोडला बंगला

खारघर मध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र !

अखेर ३६ दिवसांनी अमृतपाल पोलिसांच्या जाळ्यात

घरच्या मैदानात अजित पवारांनी केली मुख्यमंत्रीपदाची दावेदारी…

या कंपनीत एका ट्रकमधून बायोमास आणण्यात आले होते. हा ट्रक कंपनीच्या बाहेर उभा होता. हा ट्रकही या आगीत संपूर्ण जळून गेलाआहे. तसेच आगीत अनेक गाळे जळून खाक झाले आहेत. आगीत काहीच उरलेले नाही. या कंपनीत २० ते ३०कामगार होते. त्यांनाही बाहेर काढता आलेलं नाही. अग्निशमन दलाचे जवान या कामगारांचा शोध घेत आहेत.

तासाभरापासून हा शोध सुरू असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलासह पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. इतर अग्निशमन दलाच्या गाड्याही मागवण्यात येत आहे. आग लवकरात लवकर नियंत्रणा त कशी येईल याचा प्रयत्न सुरू आहे. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी आल्याचं सांगितलं जातं. कंपनीच्या इलेक्ट्रिक पॅनलमध्ये ब्लास्ट झाल्याने आग लागल्याचं सांगितलं जात असलं तरी या आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी चौकशी करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version