घरविशेषकोकण रेल्वेच्या विशेष गाड्या १२ तास उशिराने

कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या १२ तास उशिराने

गणेशभक्तांचा परतीचा प्रवास रखडला

- Advertisement -

गणेशोत्सव संपल्यानंतर कोकणातून मुंबईसह विविध शहरांकडे परतणाऱ्या गणेशभक्तांना कोकण रेल्वेच्या विलंबाचा मोठा फटका बसला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या सोडल्या असल्या तरी या गाड्यांमुळेच रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. काही विशेष गाड्या तब्बल ११ ते १२ तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना स्थानकांवर तासन्तास गाडीची वाट पाहावी लागत आहे.

गणेशोत्सवासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. यंदाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होणार हे रेल्वे प्रशासनाला आधीपासूनच माहीत होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले. मात्र, दोन विशेष गाड्यांना झालेल्या मोठ्या विलंबाचा परिणाम इतर सुमारे २० गाड्यांवरही झाला. त्यामुळे नियमित गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला असून अनेक प्रवाशांचे पुढील प्रवासाचे नियोजन बिघडले.
हे ही वाचा:
काँग्रेस हा विदुषकांचा पक्ष बनलाय!

विखे पाटील घराण्याची लेक स्वीडनच्या संसदेत

एलपीजी सबसिडीसाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य

झारखंडचा ३० लाखांचे इनाम असलेला नक्षली ब्रजेश गंझूचे वाराणसीत एन्काऊंटर
गाडीला मोठा विलंब झाल्याने स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. कुटुंबासह प्रवास करणारे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे. गणपती विसर्जनानंतर वेळेत मुंबई किंवा इतर शहरांमध्ये पोहोचण्याच्या तयारीत असलेल्या अनेक प्रवाशांना रेल्वे स्थानकांवरच ताटकळत राहावे लागले. विशेष गाड्या वाढवल्या, मात्र त्यांचे वेळापत्रक सुरळीत ठेवता आले नाही, अशी नाराजी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, अतिरिक्त गाड्यांमुळे निर्माण झालेला विलंब कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. सर्व गाड्या वेळेत धावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढणारी प्रवाशांची संख्या लक्षात घेता भविष्यात विशेष गाड्यांचे नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा समोर आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version