28 C
Mumbai
Wednesday, September 2, 2026
घरविशेषविजय बजरंग, जागृती, पंचगंगा, श्री साई यांनी दिली विजयी सलामी

विजय बजरंग, जागृती, पंचगंगा, श्री साई यांनी दिली विजयी सलामी

श्री साईनाथ सेवा ट्रस्ट मंडळाने आयोजित केलेल्या पुरुष द्वितीय श्रेणी कबड्डी

विजय बजरंग, जागृती, पंचगंगा, श्री साई यांची श्री साईनाथ सेवा ट्रस्ट मंडळाने आयोजित केलेल्या पुरुष द्वितीय श्रेणी स्थानिक गटात विजयी सलामी दिली. प्रभादेवी येथील समुद्र किनारी असलेल्या साईनाथ सेवा ट्रस्ट मंडळाच्या पटांगणावर आज पासून सुरू झालेल्या उद्घाटनाच्या सामन्यात विजय बजरंग क्रीडा मंडळाने अमर क्रीडा मंडळाला ४५-२० असे सहज पराभूत केले.
मकरंद भगत, तुषार होजारे यांच्या झंजावाती खेळाच्या बळावर विश्रांतीला २०गुणांची आघाडी घेणाऱ्या विजय बजरंगने नंतर मात्र सावध खेळ करीत विजय आपल्या नावे केला. विश्रांतीनंतर अमरच्या जयेश वाघधरे यांनी एकाकी लढत दिली. जागृतीने हिंदमाताला ५२-२४ असे नमवित दुसरी फेरी गाठली. पहिल्या सत्रात २४-१० अशी आघाडी घेणाऱ्या जागृतीने दुसऱ्या सत्रात देखील तोच जोश कायम ठेवत गुणांचे अर्धशतक पार केले. रोशन तळेकर, विराज नमसले यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. हिंदमाताचा उदय नाटेकर छान खेळला.
हे ही वाचा:
पंचगंगाने चुरशीच्या लढतीत गणेश क्लबला २९-२४ असे नमवित आगेकूच केली. पहिल्या डावात एकमेकांच्या खेळाचा अंदाज घेत दोन्ही संघांनी सावध खेळ केला. त्यामुळे मध्यांतराला ९-८ अशी नाममात्र आघाडी पंचगंगाकडे होती. दुसऱ्या डावात जोशपूर्ण खेळ करीत पंचगंगाने ५ गुणांच्या फरकाने विजय साकारला. प्रतीक सावंत, सुनील कुऱ्हाडे पंचगंगाकडून, तर रितीक गुप्ता, प्रफुल्ल पटेल गणेश क्लबकडून उत्कृष्ट खेळले. शेवटच्या सामन्यात श्री साई क्लबने अमर प्रतिष्ठानला ३३-११ असे नमवित आपली घोडदौड सुरू केली. तेजस गायकवाड, प्रणित गावंड यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा

Exit mobile version