घरविशेषविजय मल्ल्याला बनायचंय ‘कॉकरोच’!

विजय मल्ल्याला बनायचंय ‘कॉकरोच’!

सोशल मीडिया पोस्टमधून भाष्य

सध्या लंडनमध्ये राहणारा, फरार व्यावसायिक विजय मल्ल्या याने ‘कॉकरोच जनता पार्टी’बाबत केलेल्या एका पोस्टमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. मल्ल्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत, आपल्यालाही ‘कॉकरोच’ बनावेसे वाटत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, त्यामागचे कारणही त्याने या पोस्टमधून सांगितले आहे.

मल्ल्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “माझ्यावर झालेला आणि अजूनही होत असलेला अन्याय पाहता मलाही कॉकरोच बनावेसे वाटते. कदाचित कॉकरोचचे आयुष्य अधिक चांगले असेल.” या पोस्टमधून मल्ल्याने आपल्यासोबत चुकीचे वर्तन झाल्याचा दावा करत व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. विजय मल्ल्याने अंमलबजावणी संचालनालयाबाबतही (ईडी) आणखी एक पोस्ट केली आहे. देशातील सर्वात धोकादायक तपास यंत्रणा असलेल्या ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण २०२१ मध्ये बँकांना १४ हजार कोटी रुपये दिल्याचे मान्य केल्याचा दावा मल्ल्याने केला आहे. “तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर मी जे सांगतो ते सांगणे बंद करा. मात्र, ईडीने न्यायालयात काय सांगितले आहे ते ऐका,” अशा आशयाची प्रतिक्रिया मल्ल्याने आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.

हे ही वाचा:

फेटा, टिळा अन् हातात मोदक; मुख्यमंत्री फडणवीसांनी साकारला गणराय

चित्रपट पुरस्कार कार्यक्रम गुजरातला नेल्यामुळे राज ठाकरेंची चिडचिड

लडाखकडे पर्यटकांची ओढ! ८ महिन्यांतच चार लाखांचा टप्पा पार

आंध्र प्रदेशातील गणेश मंडपांना मोफत वीज

दरम्यान, किंगफिशर एअरलाइन्सचे विजय मल्ल्या, फायरस्टार इंटरनॅशनलचे नीरव मोदी आणि स्टर्लिंग बायोटेकशी संबंधित नितीन संदेसरा यांच्यासह एकूण १५ जणांना फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत या १५ जणांवर विविध बँकांकडून ५७ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या यादीत झिलॉग सिस्टिम्सचे सुदर्शन वेंकटरमन आणि रामानुजम शेषारथिनम, स्टर्लिंग बायोटेकचे नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि पुष्पेश कुमार बैद यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version