घरविशेषलडाखकडे पर्यटकांची ओढ! ८ महिन्यांतच चार लाखांचा टप्पा पार

लडाखकडे पर्यटकांची ओढ! ८ महिन्यांतच चार लाखांचा टप्पा पार

२०२५च्या संपूर्ण वर्षाचा आकडा ऑगस्टमध्येच पार

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या लडाखला यंदा पर्यटकांनी चांगलीच पसंदी दाखवत पर्यटनाने नवा विक्रम नोंदवला आहे. २०२६च्या पहिल्या आठ महिन्यांतच ४,०५,०८५ पर्यटकांनी लडाखला भेट दिली आहे. विशेष म्हणजे, हा आकडा २०२५च्या संपूर्ण वर्षात लडाखमध्ये दाखल झालेल्या ३,३५,८७२ पर्यटकांपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष लडाखच्या पर्यटन क्षेत्रासाठी विक्रमी ठरत असल्याचे चित्र आहे.

लडाख प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत २,६९,३९० पर्यटक लडाखमध्ये आले होते. याच कालावधीत २०२६मध्ये ही संख्या वाढून ४,०५,०८५ झाली. म्हणजेच वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत पर्यटकांच्या संख्येत तब्बल ५०.३७ टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यातही पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली. ऑगस्ट २०२५मध्ये ४५,२०१ पर्यटक लडाखमध्ये आले होते. ऑगस्ट २०२६मध्ये ही संख्या वाढून ७४,७५३ झाली. म्हणजेच केवळ एका वर्षात ऑगस्टमधील पर्यटकांची संख्या ६५.३८ टक्क्यांनी वाढली आहे.

लडाखमधील पर्यटनवाढ केवळ देशांतर्गत पर्यटकांपुरती मर्यादित राहिलेली नाही. जानेवारी ते ऑगस्ट २०२६दरम्यान लडाखमध्ये ३,७१,७३९ देशांतर्गत पर्यटक दाखल झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या २,४४,३०८ होती. परदेशी पर्यटकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यंदाच्या पहिल्या आठ महिन्यांत ३३,३४६ परदेशी पर्यटकांनी लडाखला भेट दिली. २०२५मध्ये याच कालावधीत २५,०८२ परदेशी पर्यटक आले होते. त्यामुळे परदेशी पर्यटकांच्या संख्येत ३२.९५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२६मध्ये परदेशी पर्यटकांची संख्या विशेष उल्लेखनीय ठरली. या महिन्यात १०,०७५ परदेशी पर्यटक लडाखमध्ये आले, जी यंदातील आतापर्यंतची सर्वाधिक मासिक संख्या आहे.

हे ही वाचा:

आंध्र प्रदेशातील गणेश मंडपांना मोफत वीज

१३ वर्षांपासून फरार आरोपी हरनेक सिंहचे अमेरिकेतून प्रत्यार्पण

आयफोनचा नवा अवतार! २.९९ लाखांचा फोल्डेबल ‘ऍपल ड्युओ’

दुबईचा व्हिडीओ दिल्ली विमानतळाचा म्हणून पसरवला; ६३ खात्यांवर कारवाई

लडाखमधील पर्यटनवाढीसाठी पायाभूत सुविधांमध्ये झालेली सुधारणा, रस्ते आणि हवाई संपर्कातील वाढ तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा हातभार असल्याचे सांगितले जात आहे. वर्षभर पर्यटनाला चालना देण्यासाठी ऑफ-सीझन महोत्सव आणि विविध कार्यक्रमांवरही भर दिला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version