घरविशेषती मैदानात आली आणि बसली विराटच्या मांडीवर! अनुष्का म्हणाली...

ती मैदानात आली आणि बसली विराटच्या मांडीवर! अनुष्का म्हणाली…

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. विराटने इंस्टाग्रामवर टाकलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून सर्वत्र या फोटोची चर्चा आहे.

विराट कोहली सध्या न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी तयारी करत आहे. २५ तारखेपासून भारताची न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका सुरु होत आहे. कानपुर येथे हा पहिला सामना खेळला जाणार आहे. या पहिल्या सामन्यासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. तर मुंबई येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विराट पुन्हा एकदा कर्णधार पदाची सूत्रे हाती घेताना दिसेल.

सध्या विराट हा मुंबई येथे कसोटी सामन्यासाठी तयारी करत आहे. मंगळवार, २३ नोव्हेंबर रोजी अशीच मैदानावर तयारी करत असताना एक पाहुणी मैदानावर आली. तिच्या सौंदर्यावर विराट भाळला. तिला जवळ घ्यायचा आणि तिच्या सोबत फोटो काढायचा मोह विराटला आवरला नाही. ही पाहुणी म्हणजे एक मांजर होती.

हे ही वाचा:

एमआयएमने पुन्हा दिली मुस्लिम आरक्षणाची बांग! ११ डिसेंबरला मोर्चा!

‘पाकिस्तानवर कारवाई न करणे ही मनमोहन सिंग सरकारची कमजोरी’

उत्तर प्रदेशात उभी राहणार १० हजार कोटींची चित्रसृष्टी

जेव्हा शरद पवारांच्या सरकारने केलेला गोवारी समाजावर लाठीचार्ज!

 

शुभ्र पांढऱ्या आणि तपकिरी रंगाच्या या मांजरीला विराटने जवळ घेतले आणि आपल्या मांडीत बसवले. विराटने त्या मांजरीला कुरवाळतानाचा फोटो इंस्टाग्रामवर टाकला आहे. या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे, तर कमेंट्सचाही महापूर पाहायला मिळत आहे. विराटची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने देखील या फोटोवर कमेंट केली आहे. तर विराटनेही त्याला चुरचुरीत असा रिप्लाय दिला आहे.

अनुष्का शर्माने या फोटोवर ‘हॅलो बिल्ली, अशी कमेंट केली आहे. तर विराटने याला उत्तर देताना ‘लौंडा फ्रॉम दिल्ली और मुंबई कि बिल्ली’ असे लिहिले आहे. सध्या नेटकऱ्यांमध्ये विराटच्या या फोटोची चांगलीच चर्चा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version