घरविशेषगरबा खेळायचाय? टीळा लावा, आरती करा; मुलींशी गैरवर्तन केलं तर थेट बुलडोझर!

गरबा खेळायचाय? टीळा लावा, आरती करा; मुलींशी गैरवर्तन केलं तर थेट बुलडोझर!

मध्यप्रदेशातील भाजपाच्या खासदारांकडून इशारा

नवरात्रीत गरबा साजरा करू इच्छिणाऱ्या गैर-हिंदूंनी प्रथम कपाळावर टिळा लावावा, गंगाजल ग्रहण करावे आणि धोती-कुर्ता घालून देवीची आरती करावी, असे वक्तव्य मध्यप्रदेशातील हुजूर मतदारसंघाचे भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी केले आहे. राज्यात नवरात्री सुरू होण्यास अवघे तीन दिवस बाकी असताना, गैर-हिंदूंना गरबा साजरा करण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार शर्मा यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी गरबा स्थळांवर सुरक्षा वाढवण्याचेही आवाहन केले असून, प्रवेश करणाऱ्यांच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी ओळखपत्रांची तपासणी, व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे देखरेख आणि संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी दक्षता घेण्याचा सल्ला दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version