घरविशेष"काँग्रेसने ती जागा पहिल्यांदाच जिंकली, आमचाच उमेदवार हरला – मग मतचोरी कुणी...

“काँग्रेसने ती जागा पहिल्यांदाच जिंकली, आमचाच उमेदवार हरला – मग मतचोरी कुणी केली?”

अलांडमधील ‘मतचोरी’च्या आरोपांवरून निशिकांत दुबे यांचा राहुल गांधींवर घणाघात

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलांड विधानसभा मतदारसंघात झालेल्या कथित ‘मतचोरी’विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करत गंभीर आरोप केले आहेत. यावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे.

दुबे म्हणाले, “मी अलांडमधील निवडणुकीसाठी पक्षाचा प्रभारी होतो. आम्हाला वाटले होते की ही जागा आपण निश्चितपणे जिंकू, कारण काँग्रेसने ती जागा कधीच जिंकलेली नव्हती. पण काँग्रेसने ती जागा पहिल्यांदाच स्वातंत्र्यानंतर जिंकली. जर खरंच मतचोरी झाली असेल, तर काँग्रेसने निवडणूक आयोगाचे आभार मानायला हवेत. आमचाच उमेदवार हरला, मग मतचोरी कुणी केली?”

पुढे बोलताना त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर घराणेशाही, उच्चभ्रू मानसिकता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असलेला अनादर यावरून निशाणा साधला. “पंतप्रधान मोदी हे गरीब कुटुंबातून आलेले आहेत. पण हे सगळे उच्चभ्रू समाज आणि घराणेशाहीतील लोक एका गावातून आलेल्या व्यक्तीशी स्वतःला जोडू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना पंतप्रधानांचा सन्मान करणे अवघड जाते,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा : 

चाबहार बंदरावरील भारतासह इतर देशांना दिलेली निर्बंध सवलत अमेरिकेने रद्द केली!

“अमेरिका पुन्हा बग्राम हवाई तळ ताब्यात घेऊ इच्छिते: ट्रम्प यांचा खुलासा!”

“मी भारत आणि मोदी यांच्या खूप जवळ आहे”

नेपाळ: भाड्याच्या घरात राहतायेत माजी पंतप्रधान ओली!

दुबे यांनी राहुल गांधींवर राष्ट्रविरोधी विचारसरणीचा आरोप करत गंभीर वक्तव्य केले. “इतक्या खालच्या स्तराची मानसिकता असलेला विरोधी पक्षनेता यापूर्वी कधीच नव्हता. राहुल गांधी सॉरोस फाउंडेशनसोबत काम करत आहेत, जे देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहे. नेहरूंनी देशाचे दोन तुकडे केले आणि आता राहुल गांधी देशाचे दहा तुकडे करू पाहत आहेत,” असा घणाघात त्यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version