27.9 C
Mumbai
Tuesday, August 11, 2026
घरविशेषतोंडात हाडूक असलेले कुत्रे कुठे आहेत? पियूष मिश्रांचा नसिरुद्दीनना रोखठोक सवाल

तोंडात हाडूक असलेले कुत्रे कुठे आहेत? पियूष मिश्रांचा नसिरुद्दीनना रोखठोक सवाल

Google News Follow

Related

ज्येष्ठ अभिनेते पीयूष मिश्रा यांनी झारखंडमधील आंदोलनस्थळी पोहोचून नसीरुद्दीन शाह यांच्या एका वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे खरपूस टीका केली आहे. तसेच नसीरुद्दीन शाह आणि इतर कलाकारांच्या मौनावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

झारखंडमधील आंदोलनात सहभागी झालेल्या पीयूष मिश्रा यांनी म्हटले, “नसीरुद्दीन शाह साहेब, आपण कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर कलाकार काही बोलत नसल्याबद्दल एक वक्तव्य केले होते की, ज्यांच्या तोंडात हाडुक आहे, ते बोलणार नाहीत. मला माफ करा, पण आपल्याबद्दल पूर्ण आदर ठेवून मला विचारायचे आहे की, यावेळी ते कोणते कुत्रे आहेत, ज्यांच्या तोंडात हाडुक आहे?”

नसीरुद्दीन शाह यांचे नेमके वक्तव्य काय होते?

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर कलाकारांच्या मौनाबाबत बोलताना नसीरुद्दीन शाह यांनी ‘द वायर’ला सांगितले होते की, कलाकार तेव्हाच बोलतील, जेव्हा त्यांचा विवेक त्यांना तसे करण्यास सांगेल. ते म्हणाले होते की, “ज्या कुत्र्याच्या तोंडात हाड असते, तो भुंकू शकत नाही,” अशी एक म्हण  आहे. जोपर्यंत ते हाड त्याच्या तोंडातून खाली पडत नाही किंवा त्याचे दात तुटत नाहीत, तोपर्यंत तो भुंकणार नाही.

झारखंडमधील आंदोलनात पोहोचले पीयूष मिश्रा

झारखंडची राजधानी रांची येथे परीक्षांमधील गैरप्रकार आणि प्रश्नपत्रिका फुटीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या १६व्या दिवशी अभिनेते आणि गायक पीयूष मिश्रा हे धरणे आंदोलनाच्या ठिकाणी असलेल्या जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये पोहोचले.

त्यांनी उमेदवारांसोबत बसून त्यांना पाठिंबा दिला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पीयूष मिश्रा यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मुलाखती पाहून आणि त्यांच्या डोळ्यांतील वेदना पाहून ते येथे आले आहेत.

हे ही वाचा:

राज ठाकरे, आपण यांना ओळखलंत का?

स्लोव्हेनियातील भारतीय दूतावासाच्या परिसराचे नुकसान; भारताकडून तीव्र निषेध

झारखंड आंदोलनाच्या बातम्या करणाऱ्या पत्रकार अमन चोप्रांवर एफआयआर

झारखंडमध्ये सीआयडीने जेपीएससीच्या माजी अध्यक्षाला केली अटक

यावेळी त्यांनी त्यांच्या ‘गुलाल’ या चित्रपटातील प्रसिद्ध ‘आरंभ है प्रचंड’ हे गाणेदेखील गायले. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना पीयूष मिश्रा यांनी रांचीला येण्यामागचे कारण सांगितले. ते म्हणाले की, येथे येण्यामागे त्यांचा कोणताही अन्य हेतू नाही. त्यांनी सामाजिक माध्यमांवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती पाहिल्या होत्या.

विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील वेदना, त्रास आणि अश्रू पाहून त्यांना स्वस्थ बसवले नाही. दोन दिवसांचा वेळ मिळताच ते थेट रांचीला आले. त्यांनी आंदोलनासाठी आर्थिक मदत देण्याचीही तयारी दर्शवली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा