29.6 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरविशेषदेशातील आयआयटीमध्ये गेल्या पाच वर्षांत ५३ विद्यार्थ्यांचा मृत्यू; १७ विद्यार्थी एससी/एसटीतले

देशातील आयआयटीमध्ये गेल्या पाच वर्षांत ५३ विद्यार्थ्यांचा मृत्यू; १७ विद्यार्थी एससी/एसटीतले

Google News Follow

आयआयटी बॉम्बे येथे साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येनंतर या संस्थांमधील आत्महत्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेषकरून एससी/एसटी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या जातीवाचक छळवणुकीतूनच होतात असा दावा केला जात आहे. त्या अनुषंगाने काही आकडेवारी समोर आली आहे.

हिंदुस्तान टाईम्सला मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०२०-२१ ते २२०२४-२५ या कालावधीत देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) किमान ५३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यापैकी अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) यात १७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.

या आकडेवारीत ४५ आत्महत्या आणि आठ अनैसर्गिक मृत्यूंचा समावेश आहे. सरकारी मालकीच्या या संस्थांमध्ये या वंचित समूहांमधून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या प्रमाणाशी ही आकडेवारी सुसंगत आहे. एकूण २३ आयआयटींमध्ये प्रतिवर्षी ३९०० जागा या एससी/एसटी वर्गासाठी राखीव असतात, अशी आकडेवारी सांगते. तर एकूण १८ हजार जागा या प्रतिवर्षी या संस्थांमध्ये असतात.

हिंदुस्थान टाइम्सने पाहिलेल्या पत्रव्यवहारानुसार, उच्च शिक्षण विभागातील अवर सचिव निलेश चंद्र श्रीवास्तव यांनी १ डिसेंबर २०२५ रोजी आयआयटी संस्थांना पत्र लिहून माहिती मागवली होती. ८ डिसेंबर २०२५ रोजी चर्चेसाठी निश्चित केलेल्या लोकसभा तारांकित प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर ही माहिती मागवण्यात आली होती. मंत्रालयाला आयआयटी संस्थांकडून उत्तरे मिळाली असली तरी ही आकडेवारी संसदेत मांडण्यात आली नाही.

आयआयटी संस्थांनी मंत्रालयाला स्वतः सादर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील प्रमुख अभियांत्रिकी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूमध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. आकडेवारीनुसार, आयआयटी संस्थांनी २०२०-२१ मध्ये पाच विद्यार्थ्यांचे मृत्यू, २०२१-२२ आणि २०२२-२३ मध्ये प्रत्येकी सहा मृत्यू, त्यानंतर २०२३-२४ मध्ये १७ आणि २०२४-२५ मध्ये १९ मृत्यू नोंदवले. सर्व मृत्यूंपैकी ८४.९ % मृत्यू आत्महत्येचे होते. २०२४-२५ या ताज्या वर्षात अनैसर्गिक मृत्यूंची संख्याही वाढली. त्या वर्षी नोंदवलेल्या १९ मृत्यूंपैकी सहा मृत्यू या श्रेणीत होते.

सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे २३ मृत्यू (४३.४%) झाले. त्यानंतर ओबीसी विद्यार्थ्यांचे १२ (२२.६.6%), एससी विद्यार्थ्यांचे १० (१८.९%), एसटी विद्यार्थ्यांचे सात (१३.२%) आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग (ईड्ब्ल्यूएस) विद्यार्थ्यांचा एक १.९%) मृत्यू झाला. एससी, एसटी आणि ओबीसी हे तिन्ही प्रवर्ग एकत्रित केल्यास २९ मृत्यू होते.

मृत्यूचे स्वरूपही वेगवेगळ्या प्रवर्गांनुसार बदलले. सामान्य प्रवर्गातील २३ मृत्यूंपैकी सात मृत्यू अनैसर्गिक म्हणून वर्गीकृत करण्यात आले. ओबीसी प्रवर्गातील सर्व १२ मृत्यू, एसटी प्रवर्गातील सर्व सात मृत्यू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील एकमेव मृत्यू आत्महत्या म्हणून नोंदवण्यात आला. एससी प्रवर्गातील १० पैकी नऊ मृत्यू आत्महत्या होते.

हे ही वाचा:

गतविजेते सात्विक-चिराग पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत बाहेर

सिक्कीमच्या रिंबी गावावर भूस्खलनाचा कहर

५ दिवसांचा वर्किंग वीक अजूनही लांबणीवर

हाफिज सईदबद्दल प्रश्न विचारताच शरीफ पळाले

सर्वाधिक मृत्यू कुठे?

आयआयटी खरगपूर, आयआयटी  दिल्ली आणि आयआयटी हैदराबाद येथे सर्वाधिक मृत्यू नोंदवले गेले असून पाच वर्षांच्या कालावधीत प्रत्येकी सात मृत्यू झाले. आयआयटी कानपूर आणि आयआयटी वाराणसी येथे प्रत्येकी सहा, तर आयआयटी मद्रासमध्ये पाच मृत्यू नोंदवले गेले.

केवळ आत्महत्यांचा विचार केल्यास, आयआयटी हैदराबादमध्ये सर्वाधिक सात आत्महत्या नोंदवण्यात आल्या. त्यानंतर आयआयटी खरगपूर, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी कानपूर येथे प्रत्येकी सहा आत्महत्या झाल्या. आयआयटी वाराणसी आणि आयआयटी पाटणा येथे सर्वाधिक अनैसर्गिक मृत्यू नोंदवले गेले असून प्रत्येकी दोन मृत्यू झाले.

सामान्य प्रवर्गातील २३ मृत्यूंपैकी १३ मृत्यू आयआयटी खरगपूर, आयआयटी वाराणसी आणि आयआयटी दिल्ली येथे नोंदवले गेले. ओबीसी प्रवर्गातील १२ मृत्यूंपैकी सात मृत्यू आयआयटी रुरकी, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मद्रास येथे झाले. एससी प्रवर्गातील १० मृत्यूंपैकी सहा मृत्यू आयआयटी हैदराबाद आणि आयआयटी दिल्ली येथे नोंदवले गेले.

यापूर्वी, जुलै २०२३ मध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने संसदेत माहिती देताना सांगितले होते की, २०१८ ते २०२३ या पाच वर्षांच्या कालावधीत आयआयटी संस्थांमध्ये ३९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. एका स्वतंत्र मूल्यांकनानुसार, मृत्यूंची संख्या यापेक्षा जास्त असू शकते.

शिक्षणतज्ज्ञ आणि प्राध्यापक IITमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होण्यामागे शैक्षणिक दबाव, सामाजिक एकाकीपणा, अपुरा प्राध्यापक-विद्यार्थी संवाद आणि समावेशकतेशी संबंधित संरचनात्मक समस्या यांचा एकत्रित परिणाम असल्याचे सांगतात. त्यांच्या मते, कॅम्पसमध्ये केवळ समुपदेशनावर अवलंबून न राहता अधिक मजबूत प्रतिबंधात्मक मदत व्यवस्था आवश्यक आहे.

BITS पिलानीचे कुलगुरू आणि आयआयटी दिल्लीचे माजी संचालक प्रा. व्ही. रामगोपाल राव यांनी सांगितले की, हा प्रश्न केवळ समुपदेशक उपलब्ध करून देण्यापुरता मर्यादित नाही. प्रा. राव म्हणाले, “आजचे विद्यार्थी अधिक विविध सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमीतून येतात आणि त्यांना शैक्षणिक दबाव, सापेक्ष गुणांकन, एकाकीपणा, प्राध्यापकांशी मर्यादित संवाद आणि नोकरीशी संबंधित चिंता यांचा सामना करावा लागतो. आयआयटी संस्थांनी संकट व्यवस्थापनापासून प्रतिबंधात्मक उपायांकडे वळण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचे कल्याण हे कॅम्पस जीवनाचा अविभाज्य भाग बनवले पाहिजे आणि प्राध्यापक-विद्यार्थी संवाद अधिक मजबूत केला पाहिजे.”

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा