29.7 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरसंपादकीय१ नोव्हेंबरला उघड होणार राहुल गांधींचे नवे टूलकिट

१ नोव्हेंबरला उघड होणार राहुल गांधींचे नवे टूलकिट

Google News Follow

काँग्रेस नेते राहुल गांधी जेव्हापासून व्हिएतनाम दौऱ्यावर गेले, तेव्हापासून चर्चा सुरू आहे की, भारतात परतताना ते काहीतरी नवीन टूलकिट घेऊन येणार आहेत. व्हिएतनाममध्ये जाऊन हा माणूस चार दिवसांत परतला; म्हणजेच काही तपश्चर्येसाठी गेले होते, असे म्हणण्याची सोय नाही. ती एक धावती भेट होती, तीसुद्धा १ नोव्हेंबरला रामलीला मैदानावर होणाऱ्या निषेध सभेच्या आधी. याचा अर्थ तिथे त्यांनी काहीतरी शिजवून आणले आहे, हे नक्की.

फ्रान्ससह युरोपमध्ये जे काही घडत आहे, त्यामागे एक समान सूत्र आहे. ते सूत्र ज्याच्या हाती आहे, त्या सूत्रधाराशी संबंधित कोणाची राहुल गांधींनी भेट घेतली आहे का, हे १ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल. जे काही असेल ते असेल, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की, दिल्लीत गर्दी जमा करण्यामागील काँग्रेसचा इरादा चांगला नाही.

राहुल गांधी व्हिएतनाम दौऱ्यासाठी १८ ऑक्टोबर रोजी रवाना झाले आणि २२ ऑक्टोबरला परतले. याचा अर्थ ते ऐशारामासाठी गेले नव्हते, तर काहीतरी कामासाठी गेले असणार. कदाचित एखादी महत्त्वाची गाठभेट असणार आहे. काँग्रेसची सभा अगदी १०-१२ दिवसांवर असताना त्यांचा हा दौरा होणे हेच सांगते की, बैठक अत्यंत महत्त्वाची असणार. ते काय करायला गेले होते, हे मोदी सरकारला माहीत असेलच, त्यामुळे सरकार तयारीत असेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा एक टप्पा काही दिवसांपूर्वी पार पडला आणि राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा नेऊन आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याची सांगता केली. मोर्चानंतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. आता रामलीला मैदानावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालय याचिकेवर निर्णय देईपर्यंत थांबण्याची राहुल गांधी यांची तयारी नाही. बहुधा ‘वोटचोरी’च्या मुद्द्यात दम नसल्यामुळे निकाल आपल्या विरोधातच लागणार याची त्यांना खात्री असावी. रामलीला मैदानावर जे काही होणार आहे, त्याला काँग्रेसने ‘प्रोटेस्ट रॅली’ म्हणजेच निषेध सभा म्हटले आहे. काँग्रेस नेते के. सी. वेणूगोपाल यांनी देशभरातून या सभेला १० लाख लोक येणार असल्याचा दावा केला आहे. बोलायला काय जाते? राहुल गांधी जेव्हा सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा घेऊन गेले, तेव्हा बरेच हातपाय मारून त्यांच्यासोबत जेमतेम आठ हजार लोक जमा झाले होते. तेही १४ पक्षांचे! आकडा २० हजारावरही गेला नव्हता.

तेच आता १ नोव्हेंबरला १० लाख लोक जमवण्याचा दावा करत आहेत. सोनिया-राहुल यांच्या हातचे खेळणे बनलेल्या काँग्रेस पक्षात एवढी ताकद उरली आहे, असे वाटत नाही. परंतु काँग्रेस नेत्यांना बडबोलेपणाची सवय झाली आहे. के. सी. वेणूगोपाल १० लाखांचा आकडा जाहीर करत आहेत, पण त्यांची केरळमधून १० हजार लोक आणण्याचीही लायकी नाही; आणि केरळमध्ये तर काँग्रेसची सत्ता आहे आणि ते वेणूगोपाल यांचे स्वतःचे राज्य आहे!

रामलीला मैदानात येणारे लोक राहुल गांधींना ऐकायला निश्चितपणे येणार नाहीत. वरिष्ठ नेतृत्वाने दम दिल्याशिवाय आणि दाम दिल्याशिवाय लोक दिल्लीत जमणार नाहीत. जी काही जमेल, ती गर्दी पैसे फेकूनच जमा केली जाईल. परंतु, प्रश्न संख्येचा नाही; काँग्रेसवाले जेवढा दावा करतायत, त्याच्या १० टक्के संख्या जरी जमा झाली, तरी दिल्लीसमोर संकट उभे ठाकल्यासारखेच आहे. दिल्लीतील व्यापाऱ्यांना ऐन दिवाळीच्या मोसमात हा धंद्याला झालेला अपशकून वाटत आहे.

हे ही वाचा:

चार सत्रांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराचे दमदार पुनरागमन

जहाजबांधणीसाठी कोरियातल्या तंत्रज्ञ, सागरी अभियंत्यांना साद

गृह, वित्त मंत्रालयाच्या इमारतीत धुराचे लोट

राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या

जंतरमंतरवरील ‘कॉकरोच आंदोलना’च्या काळात याची झलक दिसली होती. त्या आंदोलनात ३० हजार लोक सामील झाले होते, त्यापैकी २,८७३ लोक दाखलेबाज (गुन्हेगारी पार्श्वभूमीचे) होते. म्हणजेच सुमारे १० टक्के लोक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. काँग्रेसकडे अशा लोकांची अजिबात कमतरता नाही. निषेध सभेला आलेल्या लोकांपैकी १० टक्के दाखलेबाज निघाले, तर जंतरमंतरवर जे घडले त्याची अधिक तीव्र पुनरावृत्ती होऊ शकते.

फ्रान्समध्ये चार लाख लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी देश जाळायला सुरुवात केली. हे केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी विसरता कामा नये. त्यासाठी पोलिसांनीही पूर्ण तयारी ठेवली पाहिजे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे वक्तव्य सध्या चांगलेच गाजत आहे. अध्यक्ष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बिहारमध्ये जो संवाद झाला, तो काँग्रेसची मानसिकता आणि नैराश्य उघड करणारा आहे. सत्तातुरांना सत्ता मिळत नसल्यामुळे आलेले नैराश्य त्यांच्या शब्दातून बाहेर पडत आहे. मनगटातील जोर संपला की लोक शिव्या घालायला सुरुवात करतात, तेच काँग्रेस नेते करताना दिसत आहेत.

काँग्रेसची मानसिकता समजून घ्यायची असेल, तर बिहारमध्ये खरगे यांच्या सभेत ज्या काँग्रेस कार्यकर्त्याच्या विधानावरून खरगे यांनी “मोदी का बाप” असा उल्लेख केला, तो घटनाक्रम समजून घेण्याची गरज आहे. तो कार्यकर्ता म्हणाला होता, ‘जब तक विद्रोह नही होता, तब तक मोदी को हटा नही सकते.’ म्हणजेच राहुल गांधी जे ‘रिजीम चेंज’चे (सत्ता बदलाचे) स्वप्न पाहत आहेत, त्याचाच पुनरुच्चार त्या कार्यकर्त्यांने केला होता. त्याला वाटले की पक्षाध्यक्ष पाठीवर कौतुकाची थाप देतील; परंतु दुर्दैवाने त्याचे अर्धवट वाक्य खरगेंपर्यंत पोहोचले. त्यामुळे संतापलेल्या खरगेंनी ‘मोदी का बाप भी जायेगा’ असे म्हटले.

आता लोक तोंडात शेण घालू लागल्यामुळे, सोनिया गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा यांनी त्या बिचाऱ्या कार्यकर्त्यावर भाजपचा कार्यकर्ता असल्याचा शिक्का मारला. खरे तर त्या कार्यकर्त्यांने स्वतः मीडियासमोर स्पष्ट केले आहे की, तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. ही आजची काँग्रेसची परिस्थिती आहे. ‘रिजीम चेंज’चा झेंडा घेऊन खरगेंमोर मिरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या बिचाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला मेल्याहून मेल्यासारखे वाटले असेल.

असो, ही घटना काँग्रेसची मानसिकता सांगण्यासाठी पुरेशी आहे. राहुल गांधी जे विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेत, ते आता काँग्रेसमध्येही झिरपत चालले आहे. सुदैवाने देशात आता काँग्रेसचे फारसे अस्तित्व उरलेले नाही. काँग्रेस नेते बराच काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींबाबत अनुद्गार काढत होते, आता ते बापावर घसरले आहेत. मोदींना आणि त्यांच्या परिवाराला शिव्या घातल्या की काँग्रेसवाल्यांच्या मातोश्री सोनिया गांधी आणि युवराज खुश होतात हे ठाऊक असल्यामुळे, हा रबरस्टॅम्प अध्यक्ष आपला कंड भागवून घेत आहेत. सोनिया गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेसची परिस्थिती एखाद्या सी-ग्रेड डान्सबारसारखी झाली आहे. पक्षात दर्जेदार नेतृत्व उरलेले नाही, त्यामुळे जो काही कचरा उरलेला आहे, तो जिथे जाईल तिथे दुर्गंध निर्माण करत असतो.

स्वतः सोनिया गांधी हे भारतावर लादलेले एक मोठे षड्यंत्र आहे. या बाईला ना देशाबद्दल आस्था आहे, ना इथल्या बहुसंख्य हिंदूंबाबत! राहुल गांधींनी सध्या ज्या भारतविरोधी जॉर्ज सोरोस यांचे पितृत्व स्वीकारले आहे, त्यांचे चरण प्रक्षालन करण्याचे काम सोनियांच्या यूपीएच्या सत्ताकाळातच सुरू झाले होते. राहुल गांधी सुरुवातीपासून हिंदू सणावारांचा माहोल खराब करत आहेत. ते स्वतः नावापुरते हिंदू असल्यामुळे त्यांना त्याचा काही फरक पडत नाही, परंतु दिल्लीतील व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. काँग्रेसवाले त्यांच्या रोजीरोटीवर उठल्याची व्यापाऱ्यांची भावना आहे. या लोकांनी नवरात्रोत्सवात विघ्न आणलेच, आता दिवाळी खराब करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

या निषेध सभेच्या निमित्ताने भारतात फ्रान्ससारखी ठिणगी टाकण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न आहे, हे उघड आहे. राहुल गांधींची सभा देशातील हिंसक अराजकाची सुरुवात असू शकते, याची जाणीव सरकारलाही आहे. त्यामुळेच गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या पोलीस मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली, ज्यामध्ये गुप्तचर विभागाचे अधिकारीही सहभागी झाले होते.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या कोठेही दिसत नाहीत, ते एखाद्या गुपचूप मोहिमेवर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमित शहा दक्ष आहेत आणि काँग्रेसचा खरा इरादा त्यांना माहीत आहे. देशाच्या राजधानीत अराजक माजवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, याची जाणीव त्यांना झालेली आहे. त्यामुळे अमित शहा दक्ष आणि पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा