घरविशेषबोरीवली-राम मंदिरदरम्यान ४ ऑक्टोबरला चार तासांचा जम्बो ब्लॉक

बोरीवली-राम मंदिरदरम्यान ४ ऑक्टोबरला चार तासांचा जम्बो ब्लॉक

काही लोकल रद्द तर काहींच्या मार्गात बदल

मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर पुन्हा एकदा मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे. पश्चिम रेल्वेकडून रेल्वे मार्ग, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी बोरीवली आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत अप फास्ट आणि पाचव्या मार्गावर हा ब्लॉक राहणार असून, या कालावधीत काही उपनगरीय लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे रविवारच्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेच्या वेळापत्रकाची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.

ब्लॉकच्या काळात बोरीवली ते अंधेरीदरम्यान अप फास्ट मार्गावरील सर्व लोकल गाड्या अप स्लो आणि सहाव्या मार्गावरून चालवण्यात येतील. त्यामुळे या मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकावर आणि वाहतुकीच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अंधेरी ते बोरीवलीदरम्यान पाचव्या मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या डाउन फास्ट मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.
हे ही वाचा:
दुसऱ्या ९/११ चे लक्ष्य काय? अब्राहम अकॉर्ड की IMEC

इस्रायल स्मित माछर यांना विशेष पुरस्काराने गौरवणार

दिपकेंनी केली महात्मा गांधीशी स्वत:ची तुलना

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या दोन विशेष उपनगरीय सेवा
या जम्बो ब्लॉकमुळे काही अप आणि डाउन उपनगरीय लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तसेच अंधेरी आणि बोरीवलीदरम्यान धावणाऱ्या काही लोकल गाड्या हार्बर मार्गावरून गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे नियमित मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागू शकतो. ब्लॉकदरम्यान प्रभावित होणाऱ्या लोकल सेवांची सविस्तर माहिती पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागातील सर्व स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देखभाल कामामुळे तात्पुरता प्रवासाचा खोळंबा होणार असला तरी रेल्वे पायाभूत सुविधा अधिक सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी हे काम महत्त्वाचे मानले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version