घरविशेष४० देशांतील युवा नेत्यांचा राज्यपालांशी संवाद

४० देशांतील युवा नेत्यांचा राज्यपालांशी संवाद

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अंतर्गत फोरम ऑफ यंग ग्लोबल लिडर्सच्या ५० युवा सदस्यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. भारताच्या शैक्षणिक दौऱ्यावर आलेल्या ४० देशांतील या नेत्यांनी राज्यपालांशी संवाद साधला.

जगभरातील युवा नेत्यांच्या सुसंवादातून जगासमोरील सामायिक आव्हानांवर उपाय शोधता येतील असे सांगून युवकांनी संपत्ती निर्माण करावी मात्र अर्जित संपत्तीचा विनियोग समाजासाठी करावा असे आवाहन राज्यपालांनी केले.

हेही वाचा..

ट्रम्प, नेत्यान्याहू यांच्या इशाऱ्यानंतर हमास नरमला; तीन इस्रायली बंधकांना सोडले

शनिदेवाची मूर्ती असलेल्या शीळेवर आता ब्रँडेड तेलच अर्पण करता येणार

शनिदेवाची मूर्ती असलेल्या शीळेवर आता ब्रँडेड तेलच अर्पण करता येणार

मुंबईतील रंगशारदा नाट्य मंदिरात राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा

जागतिक युवकांच्या या फोरममध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन, टेनीस दिग्गज रॉजर फेडरर आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे ही अभिमानाची बाब आहे असे सांगून युवकांनी सर्वसमावेशक विकासासाठी काम करावे असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी युवा उद्योजक अमेय प्रभू, एमडी, नफा कॅपिटल, गौरव मेहता, संस्थापक, धर्मा लाइफ आणि अन्य युवा नेते उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version