घरबिजनेसमुक्त व्यापाराचा भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रावर काय होणार परिणाम?

मुक्त व्यापाराचा भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रावर काय होणार परिणाम?

वाईन कंपन्याच्या शेअर्समध्ये ही घसरण

भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार (FTA) जाहीर झाल्यानंतर काही निर्यातप्रधान क्षेत्रांमध्ये उत्साह दिसून आला, मात्र वाढती स्पर्धा आणि मार्जिनवरील दबावामुळे काही कंपन्यांचे शेअर्स घसरले. विशेषतः ऑटोमोबाइल क्षेत्राला आज फटका बसला, तर मद्यनिर्मिती क्षेत्रातील सुला व्हिनयार्ड्सच्या शेअरमध्येही घसरण नोंदवली गेली.

FTA मुळे युरोपियन बाजारात आयात-निर्यात सुलभ होणार असल्याने काही उद्योगांना थेट फायदा होण्याची अपेक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर सीफूड, रत्ने-दागिने आणि काही ऑटो अ‍ॅन्सिलरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदीचा कल दिसला. युरोपकडे निर्यातीवरील शुल्कात कपात झाल्यास या कंपन्यांची विक्री वाढू शकते, असा बाजाराचा अंदाज आहे. त्यामुळे निवडक शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली.

मात्र दुसरीकडे, भारतीय ऑटोमोबाइल उत्पादकांसाठी FTA ही चिंतेची बाब ठरत आहे. युरोपमधील मोठ्या वाहन कंपन्यांना भारतीय बाजारात अधिक सुलभ प्रवेश मिळण्याची शक्यता असल्याने स्थानिक उत्पादकांवर स्पर्धात्मक दबाव वाढू शकतो. याच भीतीमुळे आज प्रमुख ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसला आणि काही समभाग चार ते पाच टक्क्यांपर्यंत घसरले. गुंतवणूकदारांनी संभाव्य दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊन नफावसुली केल्याचेही विश्लेषक सांगतात.
हे ही वाचा:
अजित पवारांच्या विमानाचा अपघात; प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम

“मोठा भाऊ गेला… अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान”

“दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला…”

मुंबई- नवी मुंबई दोन्ही विमानतळे जोडणाऱ्या ‘मेट्रो लाईन- ८’ ची घोषणा!

दरम्यान, सुला व्हिनयार्ड्सच्या शेअरमध्येही घसरण झाली. FTA नंतर युरोपियन वाइन उत्पादकांना भारतीय बाजारात अधिक स्पर्धात्मक दरात प्रवेश मिळू शकतो, अशी भीती गुंतवणूकदारांमध्ये आहे. त्यामुळे सुलाच्या भविष्यातील वाढीवर परिणाम होऊ शकतो, या अंदाजामुळे शेअरवर दबाव आला.

एकूणच आजच्या व्यवहारात FTA चा परिणाम स्पष्टपणे दिसून आला. निर्यातदार आणि काही विशिष्ट क्षेत्रांना फायदा होण्याची आशा असताना, ऑटोमोबाइल आणि मद्यनिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांसाठी वाढती स्पर्धा ही मोठी आव्हाने ठरणार आहेत. गुंतवणूकदार सध्या सावध भूमिका घेत असून, पुढील काही दिवसांत बाजाराची दिशा जागतिक संकेतांबरोबरच FTA संदर्भातील अधिक तपशीलांवर अवलंबून राहणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version