घरबिजनेसस्थानिक चलनात व्यापाराला प्राधान्य

स्थानिक चलनात व्यापाराला प्राधान्य

ब्रिक्सच्या ११ देशांसोबत भारताची मोठी आर्थिक खेळी

डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने भारताने मोठी रणनीती आखली आहे. ब्रिक्सच्या ११ सदस्य देशांसोबत स्थानिक चलनांमध्ये व्यापार वाढवण्याचा प्रस्ताव भारताकडून पुढे केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये रुपयाचा वापर वाढवण्याबरोबरच सीमापार डिजिटल पेमेंट व्यवस्था मजबूत करण्यावर भर असेल. डॉलरऐवजी थेट रुपया, रूबल, युआन किंवा संबंधित देशांच्या स्थानिक चलनांमध्ये व्यवहार झाल्यास आंतरराष्ट्रीय व्यापारातील चलन रूपांतरणाचा खर्च आणि डॉलरवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होऊ शकते. विशेषतः रशिया, चीन, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया यांसारख्या देशांसोबत भारताचा मोठा व्यापार असल्याने या व्यवस्थेला व्यापक संधी आहे.
हे ही वाचा:
काँग्रेसच्या कामपिसाट खासदाराच्या विरोधात जेएनयुच्या विद्यार्थिनींची तक्रार

अर्थक्षेत्रातील पोंगा पंडितांना नागडे करणारा अहवाल

मोना अग्रवालला रौप्य, अवनी लेखराला कांस्य

दिवा-मुंब्रादरम्यान लोकलमधून महिला खाली पडली

या योजनेत डिजिटल चलन आणि आधुनिक पेमेंट प्रणालींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ब्रिक्स देशांच्या डिजिटल चलनांना परस्पर जोडण्याची कल्पना प्रत्यक्षात आली तर सीमापार व्यवहार अधिक जलद आणि सुलभ होऊ शकतात. मात्र, यासमोर अनेक आर्थिक अडथळेही आहेत. विविध देशांच्या चलनांचे मूल्य, व्यापारातील असमतोल, परकीय चलनाची उपलब्धता आणि प्रत्येक देशाच्या आर्थिक धोरणांमधील फरक यामुळे स्थानिक चलनातील व्यापार वाढवणे सोपे नाही. तरीही ब्रिक्सच्या वाढत्या आर्थिक प्रभावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा हा प्रयत्न महत्त्वाचा मानला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version