घरबिजनेसभारताचा परकीय चलनसाठा विक्रमी पातळीवर

भारताचा परकीय चलनसाठा विक्रमी पातळीवर

७४०.८ अब्ज डॉलरवर झेप, रुपयालाही मोठा आधार

भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशाचा परकीय चलनसाठा नव्या विक्रमी पातळीवर पोहोचला असून, २८ ऑगस्ट २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात तो ७४०.८० अब्ज डॉलरवर गेला आहे. एका आठवड्यात परकीय चलनसाठ्यात तब्बल ११.४७५ अब्ज डॉलरची वाढ झाली. विशेष म्हणजे, ही सलग नवव्या आठवड्यातील वाढ आहे. याआधी २१ ऑगस्टला भारताचा परकीय चलनसाठा ७२९.३२८ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. या सातत्यपूर्ण वाढीमुळे भारताची बाह्य आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.

या विक्रमी वाढीमागे परकीय चलनाचा मोठा ओघ महत्त्वाचा ठरला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परकीय चलनाची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि रुपयावरील दबाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. विशेषतः अनिवासी भारतीयांच्या ठेवींमधून मोठ्या प्रमाणावर डॉलर देशात आले आहेत. त्यामुळे भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी भर पडली आहे. मजबूत परकीय चलनसाठा हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा सुरक्षा कवच मानला जातो. जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली, तेलाच्या किमती वाढल्या किंवा रुपयावर दबाव आला, तर रिझर्व्ह बँकेला या साठ्याचा वापर करून बाजारातील परिस्थिती नियंत्रित करण्याची अधिक क्षमता मिळते.
हे ही वाचा:
S-400 खरेदीसाठी रशियासोबत ५० हजार कोटींची डील?

नेपाळमधील महाप्रलयातील मृतांचा आकडा १,३४४ वर

ना सिमेंट, ना काँक्रीट… सिंधू नदीवर भारताने उभारला पहिला ‘रॉक डॅम’

सहारनपूरमध्ये अनधिकृत मशिदीवर बुलडोझर

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, या एकूण परकीय चलनसाठ्यात सुमारे ६००.६७ अब्ज डॉलरची परकीय चलनमालमत्ता, तर ११६.४१ अब्ज डॉलरचा सोन्याचा साठा आहे. एका आठवड्यात परकीय चलनमालमत्तेत ९.३३७ अब्ज डॉलरची, तर सोन्याच्या साठ्याच्या मूल्यात २.१९१ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. वाढत्या परकीय चलनसाठ्यामुळे भारताची आयात क्षमता आणि बाह्य आर्थिक स्थैर्यही मजबूत होते. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाला आधार देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे अधिक मोठी ताकद निर्माण झाली आहे. त्यामुळे विक्रमी ७४०.८ अब्ज डॉलरचा परकीय चलनसाठा हा केवळ आकडा नसून, भारताच्या आर्थिक ताकदीचे आणि जागतिक आर्थिक धक्क्यांचा सामना करण्याच्या क्षमतेचे महत्त्वाचे संकेत मानले जात आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version