भारताच्या आर्थिक बाजारपेठेने जागतिक स्तरावर आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारताचे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) जगातील सर्वाधिक मूल्य असलेल्या सार्वजनिकरीत्या सूचिबद्ध स्टॉक एक्स्चेंज ऑपरेटर्समध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहे. बाजारमूल्याच्या बाबतीत एनएसईने अमेरिकेतील नॅस्डॅक (NASDAQ) आणि हाँगकाँग एक्स्चेंज अँड क्लिअरिंग (HKEX) यांना मागे टाकले आहे.
बाजारमाहितीनुसार, एनएसईचे बाजारमूल्य सुमारे ५.५४ लाख कोटी रुपये म्हणजेच ५९.६५ अब्ज डॉलरवर पोहोचले. त्या तुलनेत नॅस्डॅकचे बाजारमूल्य सुमारे ५७.६ अब्ज डॉलर, तर एचकेईएक्सचे ५७.३८ अब्ज डॉलर होते. या जागतिक क्रमवारीत अमेरिकेतील सीएमई ग्रुप पहिल्या क्रमांकावर असून, त्याचे बाजारमूल्य सुमारे १११ अब्ज डॉलर आहे. इंटरकॉन्टिनेंटल एक्स्चेंज ९५ अब्ज डॉलरच्या मूल्यासह दुसऱ्या, जर्मनीचे डॉइश बोर्स ६५ अब्ज डॉलरच्या मूल्यासह तिसऱ्या, तर लंडन स्टॉक एक्स्चेंज ग्रुप सुमारे ६०.३ अब्ज डॉलरच्या मूल्यासह चौथ्या क्रमांकावर आहे. एनएसई या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
हे ही वाचा:
परदेशी असूनही सोनिया गांधी मारुतीच्या ५० टक्के मालक कशा?
पन्नू हत्या कटप्रकरणी निखिल गुप्ताला १९ वर्षांचा तुरुंगवास
घाटकोपरमध्ये सात बांगलादेशी घुसखोरांना अटक
नेव्हल डॉकयार्डची छायाचित्रे, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी अप्रेंटिसला अटक
एनएसईच्या समभागांच्या किमतीत झालेली वाढ या कामगिरीमागील प्रमुख कारण ठरली आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये एनएसईचे समभाग बीएसईवर सूचिबद्ध झाले. त्यानंतर समभागांच्या किमतीत वाढ होत गेली. २० नोव्हेंबर रोजी एनएसईचा समभाग २,२५१ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. आयपीओमधील १,७८५ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत ही वाढ जवळपास २६ टक्के होती. या वाढीमुळे एनएसई भारतातील नवव्या क्रमांकाची सर्वाधिक मूल्यवान सूचिबद्ध कंपनीही बनली.
दरम्यान, एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान यांचे या कामगिरीबद्दल अभिनंदन करत पॉवर गिल्ट ट्रेझरीजचे विनीत नाहाटा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
