घरबिजनेसपेपालने भारतातून ६०० कर्मचाऱ्याना केलं कमी

पेपालने भारतातून ६०० कर्मचाऱ्याना केलं कमी

आणखी १,५०० नोकऱ्यांवर टांगती तलवार

प्रसिद्ध डिजिटल पेमेंट कंपनी पेपालने भारतात मोठी नोकरकपात केली आहे. कंपनीने भारतातील आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास १० टक्के म्हणजेच सुमारे ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पेपालकडून जगभरात सुरू असलेल्या पुनर्रचनेचा हा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. या नोकरकपातीचा फटका चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद येथील कर्मचाऱ्यांना बसला असून, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, ऑपरेशन्स, पेमेंट्स आणि फायनान्स अशा विविध विभागांतील पदे रद्द करण्यात आले आहे. या निर्णयापूर्वी भारतात पेपालचे ६ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत होते.
हे ही वाचा:
डीजेविरोधी भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांवर हल्ला

यासिन मलिकचे सरला भट हत्या प्रकरणाला आव्हान नाही!

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी

चीनकडून परकीय गुंतवणूकदारांना मिळणारी २०% करसवलत बंद

दरम्यान, पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भारतातील पेपलच्या कर्मचाऱ्यांपैकी तब्बल २५ टक्के म्हणजे सुमारे १,५०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची शक्यता असल्याचे एका स्वतंत्र रिपोर्टमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे, काही कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता थेट फोन किंवा ऑनलाइन कॉलद्वारे नोकरीवरून कमी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. एका कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी अनेक कर्मचाऱ्यांना एका कॉलला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. याच कॉलमध्ये त्यांना नोकरीवरून कमी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आणि कॉल संपताच त्यांच्या कंपनीतील सिस्टीम अॅक्सेसवर बंदी घालण्यात आली.

नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना पुढील प्रक्रियेबाबत ऑफ-बोर्डिंग ईमेल पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नवीन नोकरी शोधण्यासाठी काही मदत आणि एका महिन्याच्या पगाराइतका पगार देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version