घरबिजनेसखासगी गुंतवणुकीत सहा महिन्यांत २६.६ लाख कोटींच्या प्रकल्पांची घोषणा

खासगी गुंतवणुकीत सहा महिन्यांत २६.६ लाख कोटींच्या प्रकल्पांची घोषणा

गुंतवणुकीत ५८.५ टक्क्यांची वाढ

देशातील खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला मोठी गती मिळाली असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत नवीन प्रकल्पांच्या घोषणांमध्ये ५८.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत खासगी कंपन्यांनी तब्बल २६.६ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांची घोषणा केली आहे. भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट बॅरोमीटरच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. मागील नऊ वर्षांतील पहिल्या सहामाहीच्या सरासरीच्या तुलनेत ही गुंतवणूक ४.४ पट अधिक आहे.

एकूण प्रकल्प घोषणांमधील खासगी क्षेत्राचा वाटाही वाढला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ७४.२ टक्के असलेला हा वाटा चालू वर्षात ८६.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सरकारच्या धोरणात्मक सुधारणा, पायाभूत सुविधांवरील वाढता खर्च आणि उद्योगांसाठी निर्माण झालेले अनुकूल वातावरण यामुळे खासगी कंपन्यांचा गुंतवणूकविषयक आत्मविश्वास वाढत असल्याचे चित्र आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता कायम असतानाही भारतातील गुंतवणुकीच्या संधींकडे उद्योगविश्व सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे.

हे ही वाचा:
भारत-नेपाळ सीमेवर विशेष आर्थिक क्षेत्रे उभारण्याची तयारी

बर्ड फ्लूचा पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका

पाकिस्तानातून दहशतवाद पसरवणाऱ्यांच्या जम्मू-काश्मिरातील जमिनी जप्त

अमेठीत ख्रिस्ती धर्मांतर करणाऱ्या १० जणांच्या टोळक्याला अटक

क्षेत्रनिहाय विचार करता उत्पादन क्षेत्रात ८.१ लाख कोटी रुपये, तर वीज क्षेत्रात ७.७ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा झाली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानेही मोठी झेप घेत सुमारे ९.५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची नोंद केली आहे. विशेषतः डेटा सेंटर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील पायाभूत सुविधांमुळे गुंतवणुकीला चालना मिळाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत आयटी क्षेत्रातील प्रकल्प घोषणांचे मूल्य केवळ ७० हजार कोटी रुपये होते.

दरम्यान, गुंतवणुकीच्या घोषणांसोबत प्रत्यक्ष प्रकल्पपूर्तीतही वाढ झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत १.८ लाख कोटी रुपयांचे खासगी प्रकल्प पूर्ण झाले. २०१६-१७ नंतरच्या याच कालावधीतील हा सर्वोच्च आकडा आहे. सर्वेक्षणातील ५४ टक्के कंपन्यांनी भांडवली गुंतवणूक वाढवली असून, जवळपास तीन-चतुर्थांश कंपन्यांनी उत्पादन क्षमता विस्तारली आहे. त्यामुळे आगामी काळात रोजगारनिर्मिती, औद्योगिक उत्पादन आणि आर्थिक विकासाला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version