घरबिजनेस‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई!

‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई!

पाच दिवसांत जगभरातील कलेक्शन ६६४ कोटींच्या जवळ

रणबीर कपूर अभिनीत ‘रामायण: पार्ट १’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या भव्य चित्रपटाने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय चित्रपटसृष्टीत नवा विक्रम प्रस्थापित केला. विशेष म्हणजे, दिवाळीनंतरच्या पहिल्या सोमवारी सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरण्याचा मान ‘रामायण’ने मिळवला आहे. यासोबतच रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २’ चित्रपटाचा पहिल्या सोमवारच्या कमाईचा विक्रमही मोडीत काढला आहे. त्यामुळे चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

९ नोव्हेंबर रोजी चित्रपटाने भारतात तब्बल १२६ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली, तर निव्वळ कमाईचा आकडा १०७.५० कोटी रुपयांवर पोहोचला. विशेष म्हणजे, चौथ्या दिवसाच्या तुलनेत पाचव्या दिवशी कमाईत तब्बल ९१.५ टक्क्यांची वाढ झाली. यापूर्वी सलमान खानच्या ‘टायगर ३’ चित्रपटाने दिवाळीनंतरच्या दिवशी ५९.२५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली होती. मात्र, ‘रामायण’ने हा विक्रम जवळपास दुप्पट कमाई करत मागे टाकला. भारतातील चित्रपटाची एकूण निव्वळ कमाई ३४६.३५ कोटी, तर ग्रॉस कमाई ४१३.९० कोटी रुपये झाली आहे.

चित्रपटाच्या कमाईत हिंदी आवृत्तीचा सर्वाधिक वाटा असून, पाचव्या दिवशी हिंदीतून ८७.२५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई झाली. कन्नडमधून ७.५० कोटी, तेलुगूमधून ६ कोटी, तमिळमधून ४ कोटी आणि मल्याळममधून २.७५ कोटी रुपये मिळाले. परदेशातील बाजारपेठेतही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून, पाचव्या दिवशी तेथून २५ कोटी रुपयांची कमाई झाली. त्यामुळे परदेशातील एकूण ग्रॉस कलेक्शन २५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
हे ही वाचा
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण

ठाकुर्लीत अटक केलेल्या नक्षलवाद्याच्या माहितीवरून झारखंडमध्ये शस्त्रसाठा जप्त

ट्रम्प यांच्या एका विधानाने कच्च्या तेलाच्या बाजाराला मोठा धक्का

बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा भडका; बसला आग लावल्याने चालकाचा मृत्यू

नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम, साई पल्लवी सीता, तर यश रावणाच्या भूमिकेत आहे. रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसत आहे. भव्य निर्मिती आणि दमदार कलाकारांमुळे चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. पाच दिवसांत जगभरातील एकूण ग्रॉस कमाई ६६३.९० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मात्र, तब्बल ४ हजार कोटी रुपये खर्चून तयार झालेल्या या चित्रपटाला निर्मिती खर्चाच्या तुलनेत अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version