घरक्राईमनामाछत्रपती संभाजीनगरमधून २,२७९ लिटर पतंजली तूप जप्त

छत्रपती संभाजीनगरमधून २,२७९ लिटर पतंजली तूप जप्त

दिवाळीच्या तोंडावर एफडीएची कारवाई

दिवाळीच्या सणात मिठाई आणि खाद्यपदार्थांची मागणी वाढलेली असतानाच पतंजलीच्या तुपावर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पतंजली आयुर्वेदच्या सुपर डिस्ट्रिब्युटरकडून तब्बल २०.२० लाख रुपये किमतीचे २,२७९.७ लिटर गायीचे तूप जप्त करण्यात आले आहे. तुपाच्या लेबलिंगमध्ये चुकीची माहिती देण्यात आल्याचा आणि भेसळ असल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे. या कारवाईमुळे सणासुदीच्या काळात बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

एफडीएने संबंधित वितरकाकडून एकूण ४,०३२ युनिट्सचा साठा ताब्यात घेतला आहे. या उत्पादनांच्या लेबलिंगमध्ये अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ मधील तरतुदींचे प्राथमिकदृष्ट्या उल्लंघन झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, तुपात भेसळ असल्याचे अद्याप अंतिम तपासणीत सिद्ध झालेले नाही.

हे ही वाचा:

दिवाळीपूर्वीच दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात

अमेरिकेचा इराणच्या केशम बेटावर हल्ला

रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ‘रिजिम चेंज’ होऊ देणार नाही!

रेवंत रेड्डी, तुम्ही तेलंगणाला काँग्रेस नेत्यांचे एटीएम बनवले!

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एफडीएने राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. या मोहिमेत सात विभागांमधील ११४ आस्थापनांवर कारवाई करत एकूण ९ कोटी १ लाख रुपये किमतीचे सुमारे ३.५३ लाख किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. तसेच, १९ अन्न व्यावसायिकांचे परवाने आणि नोंदणी निलंबित करण्यात आली आहे. या मोहिमेत १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १६ जणांना अटक करण्यात आली आहे. सात आस्थापने सील करण्यात आली असून, सहा वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version