घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषण१० लाखांच्या दाव्याचे रामलीला मैदानात दहन |

१० लाखांच्या दाव्याचे रामलीला मैदानात दहन |

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आज दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची रॅली झाली. ‘मॉक पार्लमेंट’प्रमाणे हा वारही फुसका ठरला. काँग्रेस नेते राहुल गांधींनी घोषित केलेला आणखी एक कार्यक्रम कसाबसा मार्गी लागला; या पलीकडे या रॅलीतून काहीही निष्पन्न झाले नाही. रामलीला मैदान १२ एकरांचे असून २१ पक्षांनी ताकद लावूनसुद्धा ते पूर्ण भरले नाही. अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. १० लाख लोकांना आणण्याचा दावा होता; प्रत्यक्षात मात्र देशभरातून ताकद लावून ५० हजार लोकही जमले नाहीत. काँग्रेसच्या पाठीशी जनता नाही, हे रामलीला मैदानावरील सभेच्या निमित्ताने पुन्हा उघड झाले. काँग्रेसकडे आता ध्रुव राठीसारखे समर्थक उरलेले आहेत, जे पैसे घेऊन यूट्यूबवर आवाहन करतात की, रामलीला मैदानावर मोठ्या संख्येने एकत्र या. प्रत्यक्षात ते स्वतः मात्र येत नाहीत. या सभेच्या निमित्ताने जनतेचे भले होणार नाही हे उघडच होते; रील बनवणाऱ्यांनी मात्र चांगलेच पैसे कमवले. जेवढी गर्दी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी रामलीला मैदानात जमवली, त्यापेक्षा जास्त गर्दी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जिथे कुठे जातात तिथे होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version