घरक्राईमनामाअभिनेते ऐश्वर्य ठाकरे यांच्या बँक खात्यातून १९ हजारांची चोरी

अभिनेते ऐश्वर्य ठाकरे यांच्या बँक खात्यातून १९ हजारांची चोरी

ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अंधेरी पश्चिम येथील रहिवासी आणि अभिनेते ऐश्वर्य स्मिता ठाकरे यांच्या बँक खात्यातून अज्ञात सायबर भामट्याने परस्पर पैसे काढून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

नोकरीला लागल्यावर १६ दिवसात घरकामगाराने लांबवले ३० लाखांचे सोने

रेवंत रेड्डी, तुम्ही तेलंगणाला काँग्रेस नेत्यांचे एटीएम बनवले!

बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने केली ५४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

सत्ताबदल लोकशाही मार्गानेच हवा!

मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १.३० ते १.४० वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्या ठाकरे आपल्या राहत्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून पैसे कपात झाल्याचे मेसेज आले. कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय किंवा संमतीशिवाय अज्ञात व्यक्तीने त्यांच्या ॲक्सिस बँकेच्या खात्यातून एकापाठोपाठ एक अशा व्यवहारांद्वारे एकूण १९,६३८रुपयांची रक्कम परस्पर लंपास केली.

खात्यातून परस्पर पैसे कापले गेल्याचे लक्षात येताच ऐश्वर्या ठाकरे यांनी तत्काळ ओशिवरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) २००० च्या कलम ६६(क) आणि ६६(ड) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ओशिवरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version