घरक्राईमनामानांदेडमधील शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

नांदेडमधील शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

बालकासह मातेचाही मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांकडून तक्रार

- Advertisement -

शासकीय रूग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रकरण तापलेले असताना नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस. आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयामध्ये ४८ तासांमध्ये ३१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या मृतांमध्ये १२ बालकांचा समावेश होता. यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती.

रुग्णालयात एका बालकासह मातेचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. नांदेडच्या कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकाच्या मृत्यू प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात या संबधित तक्रार दाखल केली आहे.

नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये अंजली वाघमारे (वय २२ वर्षे) या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. तिने मुलीला जन्म दिला. मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर, महिलेची देखील प्रकृती बिघडत गेली आणि तिचाही मृत्यू झाला. महिलेचाही मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यामुळे महिलेचे नातेवाईक असलेल्या कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

हे ही वाचा:

‘मोदी, खूप बुद्धिमान व्यक्ती’

चीनच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी लवकरच हवाई दल आणखी सुसज्ज

‘डीन’ला स्वच्छतागृह साफ करायला लावण्याप्रकरणी खासदार हेमंत पाटलांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा

इटलीमध्ये पर्यटकांची बस उलटून २१ ठार

तसेच त्यांचे नातेवाईक रुग्णालयात भरती असताना त्यांना बाहेरुन ४० हजारांहून अधिकची औषध खरेदी करण्यास सांगितल्याचे त्यांनी सांगितले. रक्त व इतर तपासण्यासाठीही देखील पैसे खर्च करावे लागले. अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर यांनी उपचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी रात्री शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता एस आर वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version