घरक्राईमनामापुणे पोलिसांची कारवाई; फरार बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल अटकेत

पुणे पोलिसांची कारवाई; फरार बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल अटकेत

छत्रपती संभाजीनगरमध्ये केली कारवाई

पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात दोन दुचाकीस्वारांना पोर्शे कारने चिरडणाऱ्या वेदांत अग्रवाल याच्या वडिलांना अटक केली आहे. अल्पवयीन असलेला वेदांत अग्रवाल याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर विशाल अग्रवाल फरार झाले होते. तपासादरम्यन पुणे पोलिसांनी त्यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवार, २१ मे रोजी पहाटे छत्रपती संभाजीनगर येथून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले. विशाल अग्रवाल यांना आता दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येईल. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असून त्याने पोर्शे कारने पुण्यात दोघांना चिरडले. यानंतर पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम ३, ५ आणि १९९अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे ठाऊक असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमनाच्या कलम ७५ आणि ७७ अंतर्गत आखणी एक गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे विशाल अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्या होत्या. गुन्हा दाखल होताच अल्पवयीन मुलाचे वडिल फरार झाले होते. त्यानंतर या बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली होती.

हे ही वाचा:

पाचव्या टप्प्यात कुणाचा सुपडा साफ होणार?

गावाचा मतदानावर बहिष्कार, राहुल गांधी पोहचतास दिल्या ‘जय श्री राम’च्या घोषणा!

‘मतदान केंद्रावर दिरंगाई हे उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच रडगाणे’

‘आप’ला २०१४ ते २०२२ या काळात ७.०८ कोटींचा परदेशी निधी

या प्रकारांची पुणे पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाईला सुरुवात केली आहे. वेदांत अग्रवाल हा ज्या हॉटेलमध्ये दारु प्यायला होता, त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version