घरक्राईमनामानाशिकनंतर आता कॉर्पोरेट जिहाद नरिमन पॉईंटला! स्टेट बँकेत हिंदू महिला टार्गेट

नाशिकनंतर आता कॉर्पोरेट जिहाद नरिमन पॉईंटला! स्टेट बँकेत हिंदू महिला टार्गेट

राजस्थानातील उदयपूर येथे एफआयआर दाखल

नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी (TCS) च्या बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ) युनिटमधील महिला कर्मचाऱ्यांकडून लैंगिक अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराचे आरोप समोर आले. कॉर्पोरेट जिहादच्या या प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली. यानंतर आता असेच काहीसे प्रकरण पुन्हा एकदा उघडकीस आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मधील हे प्रकरण असून यावरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

मुंबईतील नरीमन पॉइंट येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या बॅकबे रिक्लेमेशन शाखेशी संबंधित हे प्रकरण आहे. एसबीआयमधील सफिन गोडल आणि मोहम्मद आदिल या दोन कर्मचाऱ्यांनी एका विवाहित हिंदू महिला अधिकाऱ्याला इस्लाम स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. संबंधित महिला अधिकारी उच्चशिक्षित असून विवाहित असल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर संबंधित महिलेच्या पतीने राजस्थानातील उदयपूर येथे एफआयआर दाखल केली आहे. पत्नी आणि त्यांची आठ वर्षांची मुलगी सफिन याच्यासोबत घरातून निघून गेल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सफिन गोडल हा संबंधित महिलेसोबत फरार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय सफिन गोडल आणि मोहम्मद आदिल यांनी संबंधित महिलेच्या पतीला अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. “मुंबईत परत येऊ नको” असा इशारा दिल्याचीही माहिती समोर आली आहे. या आरोपांमुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून काही संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर अद्याप मुंबई पोलिस, राजस्थान पोलिस किंवा एसबीआय प्रशासनाकडून अधिकृत निवेदन समोर आलेले नाही.

हे ही वाचा:

घरात एसीचा स्फोट होऊन स्पर्धा आयोगाचे पहिले प्रमुख, धनेंद्र कुमार दगावले

एअर इंडिया, इंडिगोकडून देशांतर्गत विमानसेवेत कपात

ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात माजी न्यायाधीश गिरीबाला सिंग यांना अटक

नीट फेरपरीक्षेवर पंतप्रधान कार्यालय ठेवणार नजर

यापूर्वी, नाशिकच्या मुंबई नाका परिसरात असलेल्या टाटा कन्सल्टन्सी (TCS) च्या बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ) युनिटमधून धक्कादायक प्रकार समोर आला होता. या कंपनीतल्या एचआर मॅनेजरकडून धर्मांतरासाठी जबरदस्तीसाठी केली जात होती. नमाज पठण करायला लावणं, मांसाहारी जेवण खायला लावणं, हिंदू देवतांबाबत आक्षेपार्ह शब्दात बोलणं, मुलींना लज्जास्पद वागणूक देणं, मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणं असे संतापजनक प्रकार या कंपनीत सुरू होते. यापैकी पीडित महिला १८ ते २६ वयोगटातल्या असून २०२२ पासून असे प्रकार कंपनीत सुरू होते, अशी माहिती समोर आली. यामुळे कॉर्पोरेट जिहाद नावाचा प्रकार पुढे आला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version