घरक्राईमनामाअंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली

अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या ऍंटिलिया बंगल्याजवळ स्फोटकांनी भरलेली जीप सापडली. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईतील जुन्या बाँबहल्ल्यांच्या आठवणींमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

हे ही वाचा:

सोशल मिडिया, ओटीटीला वेसण

एँटिलिया हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबईतील निवासस्थान आहे. या भागात अजून काही मोठ्या व्यक्तींची निवासस्थाने देखील आहेत. आज दुपारी ३ वाजता मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाला तिथे एक संशयास्पद गाडी आढळली. या गाडीत सुमारे २५ जिलेटिनच्या काड्या सापडल्या. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेऊन तपासकार्याला सुरूवात केली आहे.

याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो गाडी सापडली आहे. याबाबत मुंबई क्राईम ब्रांच संपूर्ण चौकशी करत आहे. लवकरच सत्य काय ते समोर येईलच.

यानंतर संवेदनशील विभागातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय अतिरिक्त सुरक्षा बाळगण्यात येणार आहे.

मुंबईत यापूर्वी देखील काही बॉंबस्फोटाच्या घटना घडून गेल्या आहेत. त्याबरोबरच मागील महिन्यात दिल्ली येथे, इस्रायली दूतावासासमोर देखील एका वाहनाच्या माध्यमातूनच बाँबस्फोट घडविण्यात आला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version