घरक्राईमनामादहिसरमध्ये अमूल, गोकुळच्या बनावट पिशव्यांत दूध भरण्याचा अड्डा उद्ध्वस्त

दहिसरमध्ये अमूल, गोकुळच्या बनावट पिशव्यांत दूध भरण्याचा अड्डा उद्ध्वस्त

दहिसरमध्ये दूध भेसळ करणाऱ्या ४ जणांना अटक

नामांकित अमुल आणि गोकुळ कंपन्यांच्या दुधामध्ये अस्वच्छ पाणी मिसळून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष १२ ने पर्दाफाश केला आहे. दहिसर पूर्व येथील एका दुग्ध भेसळ करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, वसईतील बनावट पिशव्या तयार करणाऱ्या कारखान्यापर्यंत जाऊन या संपूर्ण यंत्रणांचा आढावा घेतला आहे.

दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इसम नामांकित दूध कंपन्यांच्या पिशव्यांमध्ये अस्वच्छ पाणी मिसळून ते भेसळयुक्त दूध नागरिकांना वितरित करत असल्याची गोपनिय माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष १२ ला मिळाली होती. त्यानुसार ९ जुलै रोजी दहिसर पूर्व येथील दुबे चाळ परिसरात छापा टाकण्यात आला. या कारवाई दरम्यान अमुल गोल्ड, अमुल ताजा आणि गोकुळ कंपन्यांच्या मूळ पिशव्या कात्रीने कापून, त्यातील दूध बाहेर काढून त्यात अस्वच्छ पाणी मिसळले जात असल्याचे उघड झाले. त्यानंतर या पिशव्या पुन्हा सील करून नामांकित कंपन्यांचे प्रमाणित दूध असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक केली जात होती.

घटनास्थळावरून सुरुवातीला दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यातील मुख्य आरोपीची माहिती मिळाली, त्याला तेलंगणा येथून अटक करण्यात आली. मुख्य आरोपीच्या चौकशीनुसार पालघर जिल्ह्यातील वसई पूर्व येथील लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट समोरील बाबुभाई शहाणी कंपाउंडमध्ये छापा टाकण्यात आला. या ठिकाणी अमुल दुधाच्या बनावट पिशव्या तयार करणारा कारखाना उघडकीस आला असून, अमुलचे बनावट छापे व पिशव्या तयार करण्याचे अंदाजे १० लाख रुपये किमतीचे मशीनरी हस्तगत करण्यात आले. हा मुख्य आरोपी सन २०२१ पासून मुंबई व मुंबई उपनगरांमध्ये दूध भेसळीसाठी लागणाऱ्या बनावट पिशव्यांची विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्हे शाखेने या कारवाईत १० लाख रुपयांचा खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे,अमुल व गोकुळ कंपन्यांचे २९,७५० रुपये किमतीचे एकूण ४७० लिटर दूध, अमुल कंपनीच्या १३ हजार बनावट रिकाम्या पिशव्या व प्लॅस्टिक साहित्य, तसेच दूध भेसळ करण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री, बनावट पिशव्या व यंत्रसामग्री जप्त करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

उत्तराखंडमध्ये ढगफुटीसह मुसळधार पावसाचा कहर; पूल गेला वाहून

फुकेत-दिल्ली विमानातील ऑटोपायलट बंद, हायड्रॉलिक यंत्रणेत बिघाड

पीओकेमधील हिंसक आंदोलनानंतर पाक सरकार बॅकफूटवर; चर्चेची तयारी

राज ठाकरे, आपण यांना ओळखलंत का?

लिंगया भिक्षमया गंटा वय (४२) वर्ष,सैदुलु यादया जंगिली (३३), यादया चंद्रया बतुल्ला वय(४६)रामूलू गुरुवर्य्य‌ बोडूपल्ली (६५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, गुन्हे शाखेने तपासाची पाळेमुळे शोधून या संपूर्ण रॅकेटला यशस्वीरीत्या उद्ध्वस्त केले आहे. दहिसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version