घरक्राईमनामापैसे मोजता मोजता 'आकडे' अडकले

पैसे मोजता मोजता ‘आकडे’ अडकले

- Advertisement -

कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या वरप गावठाण हद्दीतील जमिनीबाबतच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्याकरिता १ लाख २० हजारांची मागणी करणाऱ्या कल्याण तहसीलदारांना अटक करण्यात आले आहे.

दीपक आकडे (४५) आणि त्यांचा शिपाई बाबू हरड (४२) या दोघांना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. सोमवारी दुपारच्या सुमारास तक्रारदार हे लाचखोरांना १ लाख २० हजार रुपयांची लाच देण्यासाठी गेले असता तहसीलदार दीपक आकडे आणि त्यांचा साथीदार शिपाई बाबू हरड या दोघांना सापळा रचून ठाणे लाचलुचपत पथकाने तहसील कार्यालयातच रंगेहाथ पकडले. ठाणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे. त्यामुळेच शासकीय सेवेतील वर्ग एकचा अधिकारी लाच घेताना पकडला गेल्याने आता एकच खळबळ उडालेली आहे.

हे ही वाचा:

लोहमार्ग पोलिसांना हवी पुरेशा मनुष्यबळाची सुरक्षा

अनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल

ठाकरे सरकारचे आदेश झुगारून मनसेने फोडली हंडी

पुणे- कोल्हापूर प्रवास फक्त अडीच तासात…

संबंधित तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.तक्रारीत तथ्य आढळल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे. तहसील कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. तसेच महात्मा फुले पोलीस ठाण्यात या दोन्ही लाचखोरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करताच महसूल खात्यात खळबळ उडाली. यातील तक्रारदाराचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांच्या कल्याण तालुक्यातल्या वरप गावातील एका जमिनीबाबत तहसीलदार दीपक आकडे यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. तहसीलदार आकडे यांनी 26 ऑगस्ट रोजी शिपाई मनोहर उर्फ बाबू याच्यामार्फत 1 लाख रुपये स्वतःसाठी व कार्यालयीन कामकाज करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी 20 हजार अशी एकूण 1 लाख 20 हजार रुपयांची मागणी त्यांच्याकडे केवळ निकालपत्र देण्यासाठी केली होती. सुनावणीचा निकाल स्वयंस्पष्ट असतानाही त्यांनी पैशांसाठी तगादा लावला. परिणामी, बांधकाम व्यावसायिक तक्रारदाराने ठाण्याच्या लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version