घरक्राईमनामामुंबईत ड्रग्ज तस्करी टोळीकडून ३७.१७ कोटींचे 'केटामाईन' जप्त

मुंबईत ड्रग्ज तस्करी टोळीकडून ३७.१७ कोटींचे ‘केटामाईन’ जप्त

एमआयडीसी पोलीस ठाण्याने केली दोघांना अटक

मुंबई पोलिसांच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याने अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात मोठी कारवाई करत ३७ कोटी १७ लाख रुपयांचे ‘केटामाईन’ हे अमली पदार्थ जप्त केले आहे. याप्रकरणी दोन आंतरराष्ट्रीय तस्करांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अदनान अहमद नियाज अहमद सिद्दिकी (वय ३७, रा. माझगाव, मुंबई) आणि सौद मुश्ताक मणियार (वय २९, रा. गिरगांव, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उल्हास खोलम व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. २४ सप्टेंबर रोजी रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास विमानतळ मेट्रो स्टेशनजवळ, अंधेरी-कुर्ला रोडवरील फुटपाथवर दोन इसम ट्रॅव्हल/लगेज बॅगांसह संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. पोलिसांना पाहताच त्यांनी घाईगडबडीत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवून त्यांना ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

केतनच्या लग्नासाठी सिया गोयलला ८ लाखांचे कपडे, ८० लाखांचे दागिने

प्रसिद्ध कयानी बेकरीवर एफडीएचा दणका!

१ ऑक्टोबरपासून एसबीआयच्या या खातेदारांसाठी नवा नियम

पॉलिसीबाजारचा शेअर ४३ टक्क्यांनी कोसळला

पोलिसांनी चौकशी केली असता दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांची व बॅगांची एनडीपीएस (NDPS) कायद्यानुसार झडती घेतली असता, त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाची क्रिस्टल पावडर आढळली. उग्र वासावरून ती ‘केटामाईन’ असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींकडून एकूण १२ किलो ३९० ग्रॅम वजनाचे केटामाईन हस्तगत केले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची अंदाजे किंमत ३७ कोटी १७ लाख रुपये इतकी आहे.

अन्नपदार्थांतून परदेशात तस्करी

प्राथमिक तपासात हे आरोपी एका आंतरराष्ट्रीय टोळीशी जोडलेले असल्याचे समोर आले आहे. ही टोळी मुंबईतून विविध खाद्यपदार्थांमध्ये अमली पदार्थ लपवून थायलंड, इंडोनेशिया, म्यानमार, मलेशिया आदी देशांत हवाई मार्गाने तस्करी करत असल्याची माहिती निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने बजावली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version