घरक्राईमनामादिल्लीत महिलेशी गैरवर्तनाचा बनावट व्हिडिओ करणाऱ्या नदीमला अटक

दिल्लीत महिलेशी गैरवर्तनाचा बनावट व्हिडिओ करणाऱ्या नदीमला अटक

दिल्ली पोलिसांची बदनामी करण्यासाठी एआयचा वापर

दिल्लीतील जंतर मंतर येथे महिला आंदोलकांना अयोग्यरित्या स्पर्श केल्याच्या दिल्ली पोलिस अधिकाऱ्यावरील आरोपांसंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. महिलेबरोबर गैरवर्तन करताना दाखवणारा बनावट व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी पोलिसांनी नदीम अहमद नावाच्या तरुणाला अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने तयार करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हा बनावट व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा आरोप आहे.

संबंधित प्रकार दिल्लीतील जंतर-मंतर परिसरातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समोर आला. आंदोलनादरम्यान काही महिला पत्रकारांनी दिल्ली पोलिसांच्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तन आणि लैंगिक छळाचे आरोप केले होते. या तक्रारींची स्वतंत्र चौकशी क्राइम ब्रँचकडून सुरू आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला महिलेशी गैरवर्तन करताना दाखवणारा व्हिडिओ आणि पोस्टर व्हायरल झाले. तपासात हे दृश्य बनावट असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग यंत्रणेच्या निदर्शनास हा बनावट कंटेंट आल्यानंतर त्याचा तपास सुरू करण्यात आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्हिडिओ ३ ऑक्टोबर रोजी तयार करण्यात आला आणि ४ ऑक्टोबरला सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. तपासादरम्यान या कंटेंटचा संबंध नदीम अहमद याच्याशी असल्याचे समोर आले. त्याच्याकडून एआयशी संबंधित काही साधनेही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

ड्रोन पकडण्यासाठी पाकिस्तानने लावले चक्क ‘मासेमारीचे जाळे’

सोरोस याच्याकडून निधी मिळालेल्या सीएआयआरवर ‘दहशतवादी’ शिक्का

सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान-तुर्कीचे सैन्य होणार तैनात

फ्लायदुबईचे ‘ते’ विमान पाडण्यास इस्रायल होता सज्ज

नदीम स्वतःला स्वतंत्र पत्रकार असल्याचे सांगत होता. मात्र, पोलिसांच्या माहितीनुसार त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्याच्याशी संबंधित सोशल मीडिया हँडलवर सुमारे २४ हजार फॉलोअर्स असून, त्यावर सुमारे १,२०० पोस्ट करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नदीमने दिल्ली पोलिसांची प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने हा बनावट कंटेंट तयार केला. त्यातून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणात नदीमव्यतिरिक्त आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच हा कंटेंट तयार आणि प्रसारित करण्यामागे आणखी कोणती व्यक्ती किंवा गट आहे का, याचाही तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version