घरराजकारणपराभवाच्या नैराश्येतून काँग्रेसकडून घटनात्मक संस्थांची बदनामी

पराभवाच्या नैराश्येतून काँग्रेसकडून घटनात्मक संस्थांची बदनामी

सुधांशू त्रिवेदींचा हल्लाबोल

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडी आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला. या आंदोलनावरून भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस आणि विरोधक पराभवाच्या नैराश्यातून घटनात्मक संस्थांवर आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केला.

त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसला मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून सवाल केले. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि डुप्लिकेट मतदारांची कोणतीही पडताळणी न करता त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या बाजूने काँग्रेस का बोलत आहे आणि त्याचा फायदा कोणाला करून द्यायचा आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेसच्या भूमिकेतील कथित विसंगतीकडेही त्रिवेदी यांनी लक्ष वेधले. राहुल गांधींसह काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वी विविध ठिकाणी मतदारांच्या डुप्लिकेशनचा मुद्दा उपस्थित केला होता. अभिषेक मनु सिंघवी, अशोक गेहलोत, सचिन पायलट आणि के. सी. वेणुगोपाल यांनीही याबाबत वक्तव्ये केली होती, असा दावा त्रिवेदी यांनी केला. त्यामुळे काँग्रेसने २०१६, २०१८, २०२० आणि २०२१ मध्ये मांडलेली भूमिका योग्य होती की आता मांडत असलेली भूमिका योग्य आहे, हे स्पष्ट करावे, असे ते म्हणाले काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करताना त्रिवेदी यांनी पक्ष देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. तसेच काँग्रेसने आकाशवाणीमध्येही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला.

हे ही वाचा:

दिल्लीत महिलेशी गैरवर्तनाचा बनावट व्हिडिओ करणाऱ्या नदीमला अटक

ड्रोन पकडण्यासाठी पाकिस्तानने लावले चक्क ‘मासेमारीचे जाळे’

सोरोस याच्याकडून निधी मिळालेल्या सीएआयआरवर ‘दहशतवादी’ शिक्का

सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान-तुर्कीचे सैन्य होणार तैनात

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाला (SIR) विरोध करण्यासाठी इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत ‘सेव्ह डेमोक्रसी’ मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अन्य विरोधी पक्षांचे खासदार रस्त्यावरच धरण्यावर बसले. मोर्चादरम्यान विरोधकांनी ‘ज्ञानेश कुमार राजीनामा द्या’ आणि ‘सेव्ह माय वोट’ अशा घोषणा दिल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version