घरक्राईमनामाएनसीबीच्या ताब्यात बॉलीवूड अभिनेत्याचा मुलगा?

एनसीबीच्या ताब्यात बॉलीवूड अभिनेत्याचा मुलगा?

महाराष्ट्र नार्कोटिक्स ब्युरो अर्थात एनसीबीने धडक कारवाई करत एक रेव्ह पार्टी उढळून लावली आहे. शनिवार, २ ऑक्टोबर रोजी एनसीबीच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली. मुंबईच्या समुद्रात एका क्रूज शिपवर ही रेव्ह पार्टी रंगली होती. तर ही क्रूज शिप गोव्याच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती मिळत आहे.

या कारवाईत एनसीबीने एकूण दहा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. तर या दहा जणांमध्ये एका बड्या बॉलीवूड सुपरस्टार चा मुलगाही असल्याच्या चर्चा रंगलेल्या दिसत आहेत. एनसीबी मार्फत या कारवाईमध्ये कोकेन, एमडी ड्रग्स यासारखे अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी एनसीबीला मुंबई येथे होऊ घातलेल्या एका रेव्ह पार्टीची माहिती मिळाली होती. ही माहिती कळताच एनसीबीने कारवाई करण्यासाठी सापळा रचला. एनसीबीचे काही अधिकारी बनावट ओळख धारण करून ग्राहक म्हणून या पार्टीत शिरले. नंतर ही क्रूज शिप समुद्रात गेली. ही क्रूज गोव्याच्या दिशेने जाणार होती.

हे ही वाचा:

मी स्वतः भारतीय लस घेतली आहे, यूएनजीए अध्यक्षांनी जगाला सांगितले

एलएसीचं रक्षण करायला ‘वज्र’ तैनात

शहरांमधील कचऱ्याचे डोंगर नष्ट करणार

तुमच्या राजकारणापायी शेतकऱ्यांचा बळी देऊ नका

या पार्टीत अनेक बड्या घरातली लोक सामील झाली होती. क्रूज समुद्रातून निघाल्यावर या पार्टीत काही जणांनी ड्रग्स सेवन करायला सुरुवात केली. हे लक्षात आल्यावर लगेचच एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या धडक कारवाईला सुरुवात केली असून सर्वांना रंगेहात पकडले. या कारवाईत एकूण दहा जणांना ताब्यात घेतल्थाची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर यात एका मोठ्या बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version