घरक्राईमनामाअजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची हत्या

अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची हत्या

मारेकऱ्याचा शोध सुरू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाचे मुंबईतील तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी याच्यावर अनोळखी व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला, या हल्ल्यात सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाला आहे. भायखळा पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर हल्ला करण्यात आला. या घटनेत तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाला आहे. भायखळा परिसरातील म्हाडा वसाहतीमागे त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून, त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

पवारांनी लावली ७५ टक्के आरक्षणाची काडी

अमितभाई कल किसने देखा आताच निर्णय घ्या…

सद्गुरुंच्या मागे लचांड लावणारे नेमके कोण?

आमदार अतुल भातखळकरांच्या मागणीला यश, ‘अकृषिक कर रद्द’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री १२.३० च्या सुमारास घडली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी सचिन कुर्मी जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ पोलीस वाहनातून जेजे रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचे पोस्टमॉर्टम केले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version